सौजन्य - सोशल मिडीया
सातारा : सातारा ही भिमाई भूमी असून याठिकाणी लवकरच भव्यदिव्य भीमाई स्मारक होणार आहे. सुमारे ३००-४०० कोटी रुपये खर्च करून हे स्मारक उभे केले जाणार आहे. माझे मिशन डॉ. बाबासाहेबांचे विचार घराघरापर्यंत पोचवायचे आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात रिपाइं पक्ष घेऊन जायचा आहे असा निर्धार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. दरम्यान, महायुतीतील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी रिपाइं पक्षाकडे लक्ष द्यावे आणि २० जागा विधानसभेला द्यावेत अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त तालीम संघ येथे आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय नेत्या सीमा आठवले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे, माजी राज्यमंत्री व राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जीत आठवले उपस्थित होते.
आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे शिकले आहेत. भीमाई स्मारक लवकरच भव्यदिव्य होणार आहे. सुमारे ३००-४०० कोटी रुपये खर्च करून हे स्मारक उभे केले जाणार आहे या परिसराच्या आजूबाजूची ३ ते ४ एकर जागा घेण्यात यावी. माझ्या भीमाने कधी पैशाची केली नाही कमाई, पण आमचे प्रेरणास्थान आहे. भिमाई. डॉ. बाबासाहेंबानी दलित समाजाला न्याय मिळाला म्हणून १८ तास अभ्यास अन घटना निर्मितीचे शिल्पकार झाले. डॉ. बाबासाहेब यांचा घात माईनी केला असा प्रचार करत काहींनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यात असते तर देशाच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली असती अन् रिपाइं पक्षाचा वटवृक्ष झाला असता. दि. ३ आक्टोबर १९५७ ला रिपाइं पक्ष स्थापना झाला. जशी भीमाईची भूमी आहे तशीच छत्रपतीची सातारा ही पहिली राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनख साताऱ्यात आली आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाला कोणी हात लावेल, त्याचा अपमान करेल त्याचा कोथळा मी बाहेर काढेन. असा इशारा आठवले यांनी दिला.