मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे (Amit Shah) लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) आणि सिद्धिविनायकाच्या (SiddhiVinayak) दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर (Mumbai Tour) येत आहे. त्यांच्या या दौऱ्यात भाजप-मनसे युतीची (BJP-MNS Alliance) घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P. Nadda) हे देखील शाहांसोबत दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात आगामी निवडणुका भाजप आणि मनसे सोबत लढवणार असल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवात अमित शाह लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी मुंबईत येत असतात. मात्र, त्यांचा दौरा हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांसह आशिष शेलार यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजप ‘मिशन मुंबई महापालिका’चा शुभारंभ करणार आहेत.
गेली काही दिवस राज्यातील सत्ताधारी नेते राज ठाकरेंच्या भेटीला जात आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. याबाबत बावनकुळेंनी मनसे सोबतच्या युतीचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह घेतील असे म्हटले होते.