Raj Thackeray
मुंबई : राज्यातील टोलप्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. काल (गुरुवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. ठाणे पासिंगच्या वाहनांना टोल माफ करण्यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता या बैठकीतून समोर आली आहे. यानंतर टोलबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारण आज याप्रश्नी सकाळी बैठक आणि यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. (will the toll issue be resolved today meeting followed by a press conference all eyes on raj thackeray decision)
पीसीनंतर राज ठाकरे भूमिका मांडणार?
दरम्यान, काल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ‘मी तुम्हाला एकच वाक्य सांगतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. आज (शुक्रवारी) सकाळी 8 वाजता माझ्या घरी सरकारचे प्रतिनिधी व आमच्यात बैठक होईल. यानंतर या बैठकीतील निर्णयाविषयी 10 वाजता पत्रकार परिषद असेल, या पत्रकार परिषदेत मी बैठीकीत काय निर्णय झाला. हे सांगेन’, असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे टोलबाबत कोणती भूमिका व निर्णय घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
टोलचा भार कशाला असा रोकडा सवाल
नागरिक रोड टॅक्स देत असेल तर त्यांच्यावर टोलचा भार कशाला असा रोकडा सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला. त्यांनी टोल भरुन पण राज्यातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. ठाणे, नाशिककरांनी याविषयी तक्रारी केल्याचे त्यांनी निदर्शनास आणूनन दिले. ही बैठक संपल्यानंतर त्यांनी याविषयावर अधिक बोलण्यास नकार दिला.