ठाणे : स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुपालीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली. रुपालीवर एक शस्त्रक्रिया झाली असून तिने तिच्या चाहत्यांना देखील आरोग्याकडे दुर्लक्ष न करता काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.
फोटो शेअर करत रुपालीने लिहिले की, “स्वतःची काळजी घेणे हा इतरांची काळजी घेण्याचा एक आवश्यक भाग आहे. झाड जितके निरोगी असेल तितके चांगले फळ देऊ शकेल”. जीवन अप्रत्याशित गोष्टींसह येते परंतु आपण फक्त हसणे आणि त्यास सामोरे जाण्यास तयार असणे हेच करू शकतो. #आयुष्य सुंदर आहे.
काल माझी एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली पण आता मी बरी आहे आणि बरी होत आहे, सर्व प्रेम आणि आशीर्वादांसाठी धन्यवाद. बर्याच वेळा आपण आपल्या शरीरात जे काही घडत आहे त्याकडे दुर्लक्ष करतो आपल्या सर्वांकडे दुर्लक्ष करण्याची ही प्रवृत्ती आहे जर वेदना इतकी जास्त नसेल तर आपल्याला असे वाटते की जोपर्यंत ती मुख्य गोष्ट बनत नाही तोपर्यंत ते महत्वाचे नाही. परंतु मी सर्वांना गंभीरपणे विनंती करतो की सर्वात वाईट वेदना इतके वाईट नाही कृपया डॉक्टरांना त्वरित भेटा तुमचे शरीर आणि स्वतःला गृहीत धरू नका”. सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
रुपालीवर ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुपालीने शेअर केलेल्या फोटोवर चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. तसेच ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. रुपालीने पोस्टच्या माध्यमातून डॉक्टरांचेदेखील आभार मानले आहेत.
‘बिग बॉस मराठी’ च्या दुसऱ्या पर्वामुळे रुपाली घराघरात पोहोचलेली. तसेच रुपालीने या पूर्वी छोट्या पडद्यावर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘आई कुठे काय करते?’, ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘कन्यादान’, आणि हिंदीतील ‘बडी दूरसे आये हे’ अशा मालिकांचा समावेश आहे.