आमिर खान (Aamir Khan) त्याच्या प्रत्येक चित्रपटामधील भूमिकेसाठी खूप मेहनत घेतो. याच कारणामुळे त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट (Perfectionist) म्हटले जाते. ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chadhdha) या चित्रपटासाठी २ वर्ष आमिर मेहनत घेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ४ वर्षानंतर तो रुपेरी पडद्यावर पुनरागमन (aamir come back) करत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’च्या चित्रीकरणादरम्यान आमिरला (Aamir Khan Injured In Laal Singh Chaddha Shooting) दुखापत झाली. मात्र त्याने चित्रीकरणामधून ब्रेक घेतला नाही.
[read_also content=”रस्त्यांवरील दरडी हटविण्याचे काम ; वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना https://www.navarashtra.com/maharashtra/the-work-of-removing-the-cracks-on-the-roads-necessary-measures-to-ensure-smooth-flow-of-traffic-nrab-303654.html”]
या चित्रपटामध्ये आमिर साकारत असलेली लाल सिंह चड्ढा ही भूमिका आव्हानात्मक होती. चित्रपटामधील एक सीन असा होता की लाल सिंह चड्ढा काही वर्ष फक्त धावतोय असं दाखवायचं होतं. या एका सीनसाठी आमिरने खूप मेहनत घेतली. यादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. डॉक्टरांनी त्याला फिजिओथेरपी करण्याचा सल्ला दिला होता. पण आमिरने पेन किलर खात गुडघ्याला झालेली दुखापत सहन केली आणि चित्रपटाचं चित्रीकरण सुरु ठेवलं. यामागचं कारण म्हणजे कोरोनामुळे चित्रपटाचं चित्रीकरण रखडलं होतं. पुन्हा चित्रीकरणामध्ये अडथळा न येण्यासाठी आमिरने दुखापत असतानाही चित्रीकरण पूर्ण केलं. येत्या ११ ऑगस्टला ‘लाल सिंह चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर दाखल होईल. आमिरबरोबरच अभिनेत्री करीना कपूर खान चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसेल.