आदिनाथ कोठारेचा 'पाणी'चित्रपट मंजिरी ओकने पाहिला, अभिनेत्रीची कौतुक करणारी पोस्ट चर्चेत
आदिनाथ कोठारेने दिग्दर्शन केलेला ‘पाणी’चित्रपट १८ ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. प्रेक्षकांकडून आदिनाथ कोठारेच्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुष्काळाची भीषण परिस्थिती या ‘पाणी’ चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मराठवाड्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या नागदरवाडी गावातील हनुमंत केंद्रे या तरुणाची संघर्षगाथा चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
मिलिंद गवळींची वडीलांच्या वाढदिवशी खास पोस्ट, बाबांकडे केली एक महत्वाची विनंती
नागदरवाडी गावातील हनुमंत केंद्रे आणि सुवर्णा केंद्रे यांच्या आयुष्यावर आधारित ‘पाणी’(Paani) हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे कौतुक फक्त चाहत्यांनीच नाही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीही करताना दिसत आहे. आदिनाथ कोठारेचा दिग्दर्शनक्षेत्रातला ‘पाणी’चित्रपट पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज झाला असून अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने ‘पाणी’चित्रपटाचे कौतुक केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आदिनाथच्या अभिनयाचे आणि त्याच्या दिग्दर्शनाचे कौतुक केले आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये मंजिरी ओक म्हणते, “सगळयात आधी मला ही फिल्म बघायला उशीर झाला त्यासाठी आदिनाथ खूप सॉरी… आदिनाथ काय बोलू ? हा तुझा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट कसा असू शकते ? तू खोटं बोलतोयस… अप्रतिमम्मम… चित्रपटाबद्दल बोलयाला माझ्याकडे काहीही शब्द नाहीत. एकच सांगते ज्या क्षणी नागदरवाडीत विहिरीला पाणी लागलं त्याक्षणी माझ्या आणि मला खात्री आहे की अनेकांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तू घेतलेल्या कष्टांचं चीज झालं. सलाम हनुमंत केंद्रे ह्यांच्या जिद्दीला कष्टांना आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा ताईंच्या प्रेमाला आणि तुला खूप घट्ट मिठी आणि मनापासून धन्यवाद की ह्या विषयाची आम्हाला एक सुंदर अशी गोष्ट सांगितलीस… तुझं खूप खूप खूप कौतुक… कृपया सगळ्यांनी ‘पाणी’ चित्रपट आजच ‘पाणी’ वर नक्की बघा…”
“अभिषेक आणि ऐश्वर्या स्वभावाने परस्पर विरोधी…” ‘कुछ ना कहो’फेम अभिनेत्री जरा स्पष्टच बोलली
चित्रपटात मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात हनुमंत केंद्रे यांचे इतिहास घडवणारे कार्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाणी प्रश्नांमुळे गावातील अनेक कुटुंबे गाव सोडून जात असतानाच या तरुणाने गावातच राहून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. गावात पाणी नसल्याने त्याचे लग्नही होत नसल्याचे चित्रपटात दिसेल. त्यामुळे आता गावात पाणी आणण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या या तरुणाचा हा प्रवास कसा असणार, गावात पाणी येणार का? ज्या तरुणीवर त्याचे प्रेम आहे तिच्याशीच लग्न होणार का ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला चित्रपट पाहिल्यावर कळेल.
करिष्मा कपूरच्या फॅशनचा करिझ्मा, सौंदर्याने वेधलं लक्ष
चित्रपटामध्ये,‘जलदूता’ची म्हणजेच हनुमंत केंद्रे यांची भूमिका आदिनाथ कोठारे याने साकारली असून या चित्रपटात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शनही आदिनाथ कोठारे यानेच केले आहे. तर नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते असून महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.