प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे निधन, वयाच्या ५४ व्या वर्षी मालवली प्राणज्योत; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूड इंडस्ट्रीतून दु: खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड सिने अभिनेता आणि टिव्ही अभिनेता मुकूल देव यांचे निधन झाले आहे. ते ५४ वर्षांचे होते. दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयामधील आयसीयूमध्ये अभिनेत्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मुकूल देव यांनी अखेरचा श्वास घेतला. नेमका अभिनेत्याचा कोणत्या आजारामुळे निधन झाले आहे, ही बाब कळू शकलेली नाही.
शुक्रवारी रात्री (२३ मे) मुकुल देव यांच्या निधनाचे वृत्त कळाले. मुकूल देव यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिनेसृष्टीतून केव्हाही भरुन न निघणारी ही पोकळी आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपशिखा नागपाल यांनी इन्स्टा स्टोरी शेअर केली होती. दीपशिखा यांनीच मुकुल देव यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेता मुकुल देव गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या निधनाची बातमी कळताच चाहते शोक व्यक्त करत आहेत.
सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये आता मुंगीही शिरणार नाही; मुंबई पोलिसांंनी घेतला कठोर निर्णय
‘सन ऑफ सरदार’ चित्रपटात मुकुल देव यांच्यासोबत काम केलेले अभिनेते विंदू दारा सिंग यांनी आज तकशी बोलताना अभिनेत्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, मुकुल काही काळापासून आजारी होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यानच त्याचे निधन झाले आहे. मुकुल आता स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहू शकणार नाही. आईवडिलांच्या निधनानंतर, मुकुल स्वतःला सर्वांपासून वेगळं करत होता. तो घराबाहेरही पडला नाही आणि कोणाला भेटलाही नाही. मुकुल गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो एक अद्भुत व्यक्ती होता आणि आपल्या सर्वांना त्याची आठवण येईल.
काळी जादू, अंधश्रद्धा आणि विवाहितेचा भूतकाळ ५ जूनला उलगडणार; ‘जारण’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!
दिल्लीत जन्मलेल्या मुकुल देव यांनी आपल्या अभिनय करियरची सुरुवात टेलिव्हिजन इंडस्ट्रीपासून १९९६ पासून केली होती. त्यांनी पहिल्यांदा ‘मुमकिन’ या टेलिव्हिजन मालिकेमध्ये काम केले होते. मुकुलने दूरदर्शनच्या कॉमेडी बॉलिवूड काउंटडाउन शो ‘एक से बढकर एक’ मध्येही काम केले. १९९६ मध्ये सुष्मिता सेनसोबत ‘दस्तक’ चित्रपटातून त्याने बॉलिवूड करियरला सुरुवात केली. त्याचा तो पहिला चित्रपट होता. याशिवाय ‘किला’ (१९९८), ‘वजुद’ (१९९८), ‘कोहराम’ (१९९९) आणि ‘मुझे मेरी बीवी से बचाओ’ (२००१) यासह अनेक चित्रपटांमध्ये काम करून आपल्या चाहत्यांची मने जिंकली.