dhurandhar film shoot in dombivli sanjay dutt seen on mankoli bridge
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. नुकतंच सोशल मीडियावर त्याचा शुटिंग दरम्यानचा लूक व्हायरल झाला होता. त्याच्या लूकने आणि त्याने केलेल्या ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांचे लक्ष वेधले होते. आता अशातच सोशल मीडियावर रणवीर सिंगनंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा लूक व्हायरल होत आहे. रणवीर सिंगनंतर आता संजय दत्तच्या लूकनेही सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये आता मुंगीही शिरणार नाही; मुंबई पोलिसांंनी घेतला कठोर निर्णय
सध्या आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाची शुटिंग सुरु आहे. चित्रपटाची शुटिंग मुंबई, नवी मुंबईसह वेगवेगळ्या भागात सुरु आहे. आता अशातच डोंबिवलीतही चित्रपटाची शुटिंग सुरु आहे. शुटिंग दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. डोंबिवलीतील माणकोली पुलावर शूटिंगचा थरार पाहताना अनेकांनी गर्दी केली होती. यावेळी चाहत्यांना संजू बाबाचीही झलक पाहायला मिळाली. संजय दत्तने शुटिंग दरम्यान चाहत्यांना हात दाखवला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काळी जादू, अंधश्रद्धा आणि विवाहितेचा भूतकाळ ५ जूनला उलगडणार; ‘जारण’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!
‘धुरंधर’ चित्रपटाची टीम दोन दिवस डोंबिवलीत शूट करणार आहे. शहरातील मोठा गाव माणकोली पुलावर याचं शूट सुरु असणार आहे. शूटसाठी माणकोली पूल दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. पूलावर अनेक गाड्या दिसत आहेत आणि कलाकारांचीही फौज दिसत आहे. त्यातच एक कार पाण्यात पडतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुलावर कलाकारांमध्ये संजय दत्तही होता. त्याने सर्वांना हात दाखवला याचा व्हिडिओही चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता या दरम्यान पुन्हा एकदा रणवीर सिंगचाही नवा लूक व्हायरल होतोय.
“असे भारी आपले प्रेक्षक…” पोस्ट शेअर करत संकर्षण कऱ्हाडेने शेअर केला परदेशातील चाहत्यांचा अनुभव
रणवीर एका रफ अँड टफ भूमिकेत पाहायला मिळणार असून केव्हाही न पाहिलेल्या भूमिकेत अभिनेता दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत असलेला लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची कमालीची उत्सुकता आहे. फिल्मफेअरने त्यांच्या इन्स्टा पेजवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणवीर वाढलेली दाढी, मोकळ्या केसांसह रस्त्यावर मोकळेपणाने फिरताना दिसतोय. व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटामध्ये रणवीर सिंगसोबत संजय दत्त, यामी गौतम, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांसारखे कलाकार दिसणार आहेत.