Rajeshwari Kharat Fandry Fame Actress Shares Shocking Casting Couch Experience
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरातला मोठी लोकप्रियता मिळाली. चित्रपट रिलीज होऊन १२ वर्षे उलटली आहेत. तिने साकारलेल्या शालु भूमिकेमुळेच आजही तिला चाहते हाक मारतात. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या राजेश्वरीने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने इंडस्ट्रीमध्ये तिला आलेला अनुभव तिने शेअर केला आहे. यासोबतच तिला आलेला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभवही तिने सांगितला.
इंडस्ट्रीमध्ये आलेल्या वाईट अनुभवांबद्दल राजेश्वरी खरातने सांगितलं की, ” मला इंडस्ट्रीमध्ये एक वाईट अनुभव आला आहे. मला नागराज मंजुळे यांच्या पत्नी गार्गी मंजुळे यांनी याची आधीच माहिती दिली होती. गार्गी ताई म्हणालेल्या की, इंडस्ट्रीमध्ये असं सगळं होण्यची शक्यता जास्त असते. लोकं कुठल्या पातळीला जाऊ शकतात ? काय काय विचारु शकतात ? या सगळ्या गोष्टींची पुर्वकल्पना मला आधीच त्यांनी दिलेली होती. यासोबतच त्यांनी मला यासाठी आपण स्वत: खंबीर राहायला हवं असं सांगितलं होतं.”
‘एक अशी जखम जी कधीच…’, विमान अपघातानंतर रवीनाने केला Air India ने प्रवास; झाली भावुक
राजेश्वरीने पुढे सांगितलं की, “मी कोणाचंच नाव घेणार नाही. पण, मला एका दिग्दर्शकाचा फोन आला होता. त्यावेळी मी दुसऱ्या एका चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या रियर्सलसाठी गेले होते. ते मला फोन करून म्हणाले, ‘तू आता कुठे आहेस?’ त्यांना मी सांगितलं की, दुसऱ्या एका प्रोजेक्टच्या रियर्सलसाठी आले आहे. त्यांनी मला पुन्हा विचारलं, ‘तुला किती वेळ लागेल? माझ्या स्टुडिओला ये.’ मी त्यांना सांगितलं आता येऊ शकणार नाही… मला वेळ लागेल. अचानक फोन करुन त्यांनी मला बोलवत आहेत, म्हणून मी त्यांना तुम्ही कोणत्या कारणासाठी बोलवत आहात ? काम काय ? असं विचारलं.”
Mukul Dev यांच्या मृत्यूमागील काय होते खरे कारण? भाऊ राहुल देवने केला मोठा खुलासा!
राजेश्वरीने पुढे सांगितलं की, ” यावर ते समोरुन म्हणाले की, ‘तू मला विचारायचं नाही काय काम आहे? मी सांगितल्यावर तू इथे आली पाहिजेस.’ हे ऐकताच मी त्या क्षणी रडायला लागले. त्यावेळी मग मला एका सरांनी समजावलं. ‘इंडस्ट्रीमध्ये अशा गोष्टी होत राहतात…’ पुढे त्यानंतर मी कव्हाच त्या दिग्दर्शकाचा फोन उचलला नाही. ‘मी सांगितल्यावर तू इथे आलीच पाहिजेस’ हे असं बोलणं अतिशय चुकीचं आहे. कॉम्प्रोमाइजसाठीही अनेकदा विचारणा झालेली आहे. मी तेव्हा थेट सांगितलं होतं, मला असलं काही विचारायचं नाही, मी असलं काही करत नाही. मुळात हे लोक आता अजिबात घाबरत नाहीत. खरंच हे सगळं अतिशय चुकीचं आहे.” असं राजेश्वरीने सांगितलं.