मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने प्रियकर सूरज नांबियारसोबत गोव्यात लग्न केले. २७ जानेवारीला दुपारी मल्याळी रितीरिवाजांनुसार लग्न केल्यानंतर मौनीने रात्री बंगाली रितीरिवाजानुसार सूरजसोबत सात फेरे घेतले.
लग्नाचे फोटो शेअर करत मौनीने लिहिले, सखा सप्तपद भव. सखायो सप्तपद बाबाहुव । सख्या ते गम्यम् । सख्यात ते म्योषम । सख्यांमे मयोष्ठा । याचा अर्थ ‘तू माझ्याबरोबर सात पावले चालला आहेस म्हणून, माझी मैत्री स्वीकार कर. ‘मला तुझ्यापासून वेगळे होऊ देऊ नकोस.