स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी आहे (फोटो - सोशल मीडिया)
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशक्त क्रांतीचा लढा देणारे आणि देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य क्रांतिकारक, लेखक आणि विचारवंत होते. (Swatantraveer Savarkar) त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला आणि तरुणांना देशासाठी लढण्याची प्रेरणा दिली. अंदमानच्या तुरुंगातील कठोर शिक्षाही त्यांनी न डगमगता भोगली. “हिंदुत्व” आणि “१८५७ चे स्वातंत्र्यसमर” यांसारख्या त्यांच्या ग्रंथांमधून त्यांनी राष्ट्रवादाची भूमिका मांडली. सावरकर यांचे निधन २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबई येथे झाले. आयुष्याच्या अखेरीस त्यांनी “आत्मार्पण” करण्याचा निर्णय घेतला. (Dinvishesh)
26 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
26 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
26 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष






