गेल्या अनेक दिवसापासून अभिनेता अजय देवगणचा मैदान चित्रपट चर्चेत आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक अब्दुल रहीम यांचा बायोपिक असलेल्या या चित्रपटाचा टिझर रिलिज झाल्यानंतर आता चाहत्यांना ट्रेलरची प्रतिक्षा लागून राहिलेली होती. आज अजय देवगणच्या वाढदिवसाच्या दिवशी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Maidaan Trailer Release) करण्यात आला. अजयने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर नवीन पोस्टरसह चित्रपटाच्या ट्रेलर शेअर केला. त्यांने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले – हृदय एक, समाज एक, विचार एक. पाहतो. ए. रहीम आणि त्याच्या टीम इंडियाची अनटोल्ट स्टोरी. हा चित्रपट 10 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
[read_also content=”स्कँडल, रिॲलिटी शो आणि बरंच काही…लव्ह, सेक्स और धोखा 2 चा टिझर रिलीज! https://www.navarashtra.com/movies/mouni-roy-urfi-javed-anu-malik-and-ekta-kapoor-upcoming-film-lsd-2-teaser-out-nrps-519938.html”]
मैदानाच्या अंतिम ट्रेलरमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक अब्दुल रहीम यांना फुटबॉलच्या खेळात इतिहास रचण्यासाठी किती अडचणी आल्या हे दाखवण्यात आलं आहे. ट्रेलरची सुरुवातही अशाच संवादाने होते, जी एका अशक्य कार्याकडे निर्देश करते. प्रियामणी प्रशिक्षक बनलेल्या अजय देवगणला सांगते की, संपूर्ण भारतात आम्ही जिंकू असे कोणीही विचार करत नाही पण तुम्ही करा. यानंतर, प्रशिक्षक आणि त्यांची टीम संपूर्ण ट्रेलरमध्ये संघर्ष आणि मेहनत करताना दिसत आहे.
मैदान हा भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित स्पोर्ट्स बायोग्राफी चित्रपट आहे. चित्रपटाची कथा 1952 ते 1962 या काळातील दाखवण्यात आली आहे. भारतीय फुटबॉल संघाचा हा सुवर्णकाळ होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त प्रियामणी आणि गजराव राव देखील दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज, बोनी कपूर, अरुणवा सेनगुप्ता आणि आकाश चावला यांनी केली आहे.