(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गेल्या वर्षभरात अनेक कलाकारांच्या मृत्युच्या बातम्या समोर आल्या आहेत. काहींचा अचानक मृत्यू झाला तर काही कलाकार अनेक वर्षांपासून आजाराशी झुंज देताना दिसले आहेत. अशातच आता हॉलिवूडमधूनही एक दुःखत बातमी समोर आली आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम करणारा हॉलिवूड अभिनेता पॅट फिनचं सोमवारी वयाच्या ६० व्या वर्षी लॉस एंजेलिस येथील त्याच्या घरी निधन झाले आहे. २०२२ पासून अभिनेत्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते.
OTT Series: पंचायत ते मिर्झापूर, न थांबणाऱ्या वेब सिरीज; दीर्घकाळ मिळवली प्रेक्षकांची साथ
पॅट फिन हा एक अमेरिकन अभिनेता होता. पॅट फिनचं पूर्ण नाव पॅट्रिक कॅसिडी फिन असे आहे, आणि अभिनेत्याचा जन्म ३१ जुलै १९६५ रोजी इव्हान्स्टन, इलिनॉय येथे झाला. त्याला लहानपणापासूनच अभिनय आणि कॉमेडीची आवडत होती. तो फ्रेंड्स, सेनफेल्ड आणि द मिडल (पॅट फिन मूव्हीज अँड टीव्ही शो) सारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये दिसला. फिनने १९९५ मध्ये द जॉर्ज वेंड्ट शोमध्ये मुख्य भूमिका साकारत टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं. १९९५ ते १९९७ पर्यंत, त्यांनं मर्फी ब्राउनमध्येही भूमिका केली.
चित्रपट निर्माते संदीप सिंगच्या बिल्डींगला भीषण आग; मित्राच्या मदतीला धावले अंकिता आणि विकी जैन
अभिनेत्याच्या चित्रपटांमध्ये इट्स कॉम्प्लीकेटेड (२००९) आणि सांता पॉज २: द सांता पप्स (२०१२) यांचा समावेश आहे. पॅट फिन हा एक कुशल इम्प्रोव्ह कलाकार देखील होता आणि कोलोरॅडो विद्यापीठात सहायक प्राध्यापकही होता. पॅट बिअर शार्क माईस नावाच्या सहा सदस्यांच्या इम्प्रोव्ह ट्रूपचा भाग होता. पॅट फिनच्या पश्चात त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी डोना, तीन मुलं, त्याचे पालक आणि भावंडं आहेत. पॅट फिनच्या संपत्तीबद्दल सांगायचं तर, अभिनेत्याची अंदाजे एकूण संपत्ती अंदाजे ४६५ कोटीआहे.






