बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या शैतान चित्रपटानं बॅाक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. प्रेक्षकांसह संमिक्षकांनीही चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं. आता त्याचा आगामी मैदान चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पण आता अजय चर्चेत आला आहे वेगळयाच कारणामुळे. अजयच्या शुटींगसेटवरील एक किस्सा सध्या नव्यानं समोर आला आहे. अजयच्या मस्करीमुळे त्याच्या सहकलाकाराच्या पत्निने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आता ही बातमी समोर येताच नेटिझन्सनी अजयवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.
[read_also content=”विजयने देवरकोंडाने त्याच्या पहिल्या फिल्मफेअर ट्रॉफीचा लिलाव का केला होता? 7 वर्षानंतर सांगितलं कारण! https://www.navarashtra.com/movies/vijay-deverkonda-told-why-he-sold-his-first-filmfare-award-trophy-nrps-519575.html”]
अजय म्हणाला, ‘वर्षांपूर्वी एक अभिनेता होता ज्याचे काही काळापूर्वी लग्न झाले आणि आम्ही आऊटडोअर शूटसाठी गेलो होतो. त्याची पत्नीही सोबत आली होती. ती एका छोट्या शहरातील एक सामान्य मुलगी होती. त्यावेळी आम्ही रात्री शूटिंग करायचो. ती सकाळी तिच्या पतीला भेटत होती. मात्र, आम्ही त्याच्या बायकोला सांगत होतो की तिच्या नवऱ्याचे अफेअर आहे आणि तो रात्री कुठेतरी जातो. रात्री शूटिंग होत नाही. मी तिला सांगायचे की मी रात्री 10.30 वाजता माझ्या खोलीत परत यायचे. यावर तिने पतीवर विश्वास असल्याचे सांगितले. आठ दिवस हा प्रकार सुरू होता. नवव्या दिवशी, आम्हाला जाग आली आणि कळलं की तिने खरंच गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर ती तिच्या पतीशी सतत या गोष्टीवर भांडत राहिली, त्याला विचारत होती की तू काय करतोस!’
आता ही बातमी समोर आल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘अजय उघडपणे याबद्दल बोलत आहे जणू काही खुप मोठं काम केलयं, हा निव्वळ फालतुपणा आहे. काही नेटिझन्स असा अंदाज लावत आहेत की ती वीर दासची पत्नी होती आणि तो 2015 मध्ये रिलीज झालेला ‘शिवाय’ चित्रपट ज्याचे शूटिंग करत होता.