मैदान चित्रपट प्रदर्शित होणार ओटीटीवर : अजय देवगण (Ajay Devgn) सध्या त्याच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे मागील काही महिन्यांमध्ये लागोपाठ दोन चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाले. त्यापैकी एक ‘शैतान’ (Shaitaan) आणि दुसरा ‘मैदान’ (Maidaan) आहे. या दोन्ही अभिनेत्यांच्या चित्रपटांच्या कथा प्रेक्षकांना भावल्या आहेत आणि प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. अजय देवगणचा ‘शैतान’ चित्रपटगृहांनंतर आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ओटीटीवर शैतान चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
आता अभिनेत्याचा ‘मैदान’ हा चित्रपटही ओटीटीला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. अजयचा ‘मैदान’ हा चित्रपट कधी आणि कोणत्या OTT वर पाहायला मिळणार हे आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अजय देवगणचा चित्रपट ‘मैदान’ 11 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टक्कर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’ या चित्रपटाशी झाली होती. असे असतानाही अजयच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपयांपर्यंत कमाई केली होती.
केव्हा आणि कुठे होणार मैदान चित्रपट प्रदर्शित
मैदान हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजयचा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर स्ट्रीम केला जाईल असे म्हंटले जात आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर हा चित्रपट जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होईल. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.