फोटो सौजन्य - सोशल मीडिया
खेल खेल में चित्रपटाची निराशाजनक कामगिरी : बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये खेल खेल में, वेदा आणि स्त्री २ हे चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये खेल खेल में चित्रपटामध्ये अक्षय कुमार, तापसी पन्नू असा मल्टी कलाकारांनी बनवलेला चित्रपट आहे. या चित्रपटाचे अक्षय कुमार आणि टीमने दमदार प्रमोशन केले. त्याचबरोबर फरीद खानने बॉलीवूडमध्ये १४ वर्षानंतर पुनरागमन केले आहे. दिग्दर्शक मुदस्सर अझीझ यांच्या ‘खेल खेल’ या विनोदी चित्रपटात, आशा होती की हा चित्रपट अक्षय कुमारची कारकीर्द पुन्हा रुळावर आणेल. पण कथा तशीच राहिली आणि अक्कीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कामगिरी करत आहेत.
रक्षाबंधनाच्या सुट्टीतही ‘खेल खेल में’ला चित्रपटगृहांमध्ये फारसा प्रेक्षक मिळाला नाही, त्यामुळे या मल्टीस्टारर चित्रपटाची कमाई ५ व्या दिवशी खूपच निराशाजनक झाली आहे. सोमवारच्या चाचणीत हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला आहे. ज्याची भीती होती ती खरी होताना दिसत आहे आणि रिलीजच्या अवघ्या 5 दिवसांत बॉक्स ऑफिसवरील ‘खेल खेल में’चा खेळ संपत असल्याचे दिसत आहे. अक्षय कुमारच्या चित्रपटाला सुट्ट्यांचा कोणताही फायदा घेता आला नाही आणि कमाईच्या बाबतीत तो कुचकामी ठरला आहे.
हेदेखील वाचा – भारताच्या या क्रिकेटरने साजरा केला रक्षाबंधन! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
खेल खेल में या चित्रपटाने पहिल्या पाच दिवसांमध्ये १६.८ कोटींची कमाई केली आहे. अजुनपर्यत या चित्रपटाने ५० कोटींचा टप्पा देखील ओलांडला नाही.
बॉलीवूडचा नुकताच प्रदर्शित झालेला स्त्री २ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यत २५० कोटींहून अधिक कमी केली आहे. या चित्रपटाने ४ दिवसांमध्ये २८३ कोटींची कमाई केली आहे.