2000 साली प्रदर्शित झालेला हेराफेरी चित्रपट अजूनही लोकांच्या आवडत्या चित्रपटांच्या लिस्टमध्ये आहे. या चित्रपटाच्या शेवटच्या दोन भागात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या त्रिकुटाचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता चाहते तिसर्या भागाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. नुकतेच परेश रावल यांनी सोशल मीडियावर ट्विट करून हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात कार्तिक आर्यनला फायनल केल्याची माहिती दिली. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर अक्षयचे चाहते खूप निराश झाले आहेत. तेव्हापासून अक्षयला हेरा फेरी ३ मध्ये पुन्हा घेण्याची मागणी होत आहे. तर या सगळ्यांवर अक्षयनेही प्रतिक्रिया दिलीये. पटकथा आवडली नसल्यामुळे चित्रपट नाकारल्याचं त्यानी सांगीतलं आहे.
[read_also content=”मिस्टर नटवरलाल चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश कुमार यांचं कर्करोगान निधन https://www.navarashtra.com/movies/mr-natwarlal-chitrapatache-director-rakesh-kumar-yanchan-karkarogan-passes-away-nrps-344242.html”]
हेराफेरी चित्रपटाची लोकप्रियता चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून ते आतापर्यंत तशीच आहे. सध्या ट्विटरवर नो अक्षय, नो हेरा फेरी ट्रेंडिंग होत आहे. अक्षयशिवाय हेरा फेरी 3 फ्लॉप होईल, असा दावा लोक करत आहेत. सोशल मीडियाचा ट्रेंड पाहून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, लोकांना चित्रपटाच्या तिसऱ्या भागात कार्तिकला बघायचे नाही. अशातच अक्षयची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत त्याने ‘हेरा फेरी’शी संबंधित प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अक्षय म्हणाला – मी ‘हेरा फेरी’चा एक भाग आहे. लोकांच्या मनात त्याच्या गोड आठवणी आहेत आणि माझ्याही त्या आठवणी आहेत. पण इतकी वर्षे आम्ही तिसरा भाग बनवला नाही याचे मला दुःख आहे, मला चित्रपटाची ऑफर आली पण पटकथा आणि पटकथेवर मी समाधानी नव्हतो. त्यामुळेच मी चित्रपटातून बाहेर पडलो.
खरं तर, शुक्रवारी परेश रावलच्या एका चाहत्याने त्यांना कार्तिक हेरा फेरीमध्ये दिसणार का, असा प्रश्न विचारला होता. यावर परेश रावल यांनी लिहिले – होय, हे खरे आहे. मात्र, या दिग्गज अभिनेत्याने चित्रपटातील उर्वरित कलाकारांबद्दल सांगितलेले नाही. या बातमीने चाहत्यांची निराशा झाली आहे, सोशल मीडियावर लोक अक्षयला हेरा फेरी 3 मध्ये परत आणण्याची मागणी करत आहेत.