बॉलीवूडचे शहेनशाह अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan ) वयाच्या या टप्प्यावरही सिनेविश्वात सक्रिय आहेत. तसेच ते सोशल मीडियावरही सक्रीय असतात. नुकताचं त्यांनी त्याच्या घराबाहेरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांना भेटायाल आलेले फॅन्स दिसत आहे. दर रविवारी अमिताभ बच्चन त्यांच्या मुंबईतील जलसा या निवासस्थानाबाहेर चाहत्यांना भेटतात. या रविवारीही त्याने चाहत्यांची भेट घेतली, ज्याचा व्हिडिओ शेअर करून त्यांनी चाहत्यांचे आभार मानले आहे.
[read_also content=”शिवजयंती निमीत्त रितेश देशमुखनं केली नव्या चित्रपटाची घोषणा, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं पोस्टर केलं शेयर! https://www.navarashtra.com/movies/reiteish-deshmukh-shared-new-movie-poster-based-on-chhatrapati-shivaji-maharaj-nrps-508392.html”]
अमिताभ बच्चन यांनी रविवारी आपल्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांना भेटण्याची परंपरा पाळली. रविवारी हजारो चाहते जलसाच्या बाहेर उभे राहून बिग बींची वाट पाहत उभे होते. बिग बींची एक झलक पाहण्यासाठी आणि त्यांना त्यांचे प्रेम दाखवण्यासाठी चाहते एकत्र येतात. नेहमीप्रमाणे यावेळीही बिग बींना भेटण्यासाठी चाहते जमले. चाहत्यांच्या प्रेमाने भरलेला हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. याला त्यांनी अतिशय भावूक कॅप्शन दिलयं, ‘हे नसेल तर काही नाही.’ असं त्यांनी लिहीलं आहे.
अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून आणि वेगवेगळ्या वयोगटातील चाहते एकत्र येताना दिसले. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, बिग बी हात जोडून आणि मोठ्या स्माईलने चाहत्यांना अभिवादन करताना दिसले. त्याने चाहत्यांना मागे ओवाळले आणि काही फॅन आर्टवर्कवर सही केली.
बिग बींच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ‘कल्की एडी 2898’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात तो सुपरस्टार कमल हासन आणि प्रभाससोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या पौराणिक चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.