अंकिता लोखंडेची 15 वर्षाची कारकीर्द : 15 वर्षांपूर्वी पवित्र रिश्ता मालिका टेलिव्हिजनवर आली आणि प्रत्येकाच्या मनात या मालिकेने आणि त्या मालिकेतील कॅरेक्टरने जागा केली. आपली एखादी तरी भूमिका चाहत्यांच्या मनात कायम राहावी हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते आणि अंकिता लोखंडेचे ते स्वप्न ‘पवित्र रिश्ता’ने साकार झाले. अंकिता लोखंडे तिच्या कामामुळे त्याचबरोबर तिच्या खासगी जीवनामुळे बऱ्याचदा चर्चेत असते. अर्चनाच्या भूमिकेमुळे अंकिता प्रत्येक घराघरात पोहचली आणि प्रेक्षकांची लाडकी अर्चना बनली. खरं तर 15 वर्षांनंतर ही मालिका आणि अर्चनाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.
[read_also content=”इंडियाज बेस्ट डान्सर 4 च्या नव्या पर्वासाठी ऑडिशनला सुरुवात, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/movies/auditions-for-the-new-season-of-indias-best-dancer-4-have-started-541220.html”]
अंकिता लोखंडेची सोशल मीडिया पोस्ट
अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री म्हणून 15 वर्ष पूर्ण झाल्यामुळे अंकिताने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती लिहिले आहे की, “15 वर्षांपूर्वी पवित्र रिश्तामध्ये अर्चना म्हणून माझा प्रवास सुरू झाला आणि आज 15 वर्षांनंतरही मला माझ्या भूमिकेसाठी इतकं प्रेम मिळत राहिल. जी माझी ओळख बनली आहे. हे मला माहीत नव्हतं अर्चना माझ्यात होती आणि तिने मला आयुष्यभर खूप काही शिकवले आहे. माझ्या कारकिर्दीची सुरुवात मला मिळालेले प्रेम, अर्चना आणि पवित्र रिश्ता तुमच्या प्रत्येकाकडून मला कायमस्वरूपी जिवंत ठेवतील आणि यापेक्षा अधिक मौल्यवान दुसरे काही असेल असे मला वाटत नाही. पण माझा प्रवास पूर्ण होणार नाही, जेव्हा मी पवित्र रिश्ता सुरू केला तेव्हा मला अभिनय कसा करावा हे माहित नव्हते या शो ने मला ते शिकवलं आणि सर्वात शेवटी, मला इतके प्रेम दिल्याबद्दल मी टेलिव्हिजन उद्योगाचे आभार मानू इच्छितो. फॅन्डम आणि स्टारडमचा माझा पहिला ब्रश एका टेलिव्हिजन शोमुळे घडला आणि त्यासाठी मी नेहमीच आभारी राहणार आहे ” अस अंकिताने तिच्या फोटोचे कॅप्शन लिहिले आहे.
अंकिता लोखंडेने केलेले काम
पवित्र रिश्ता या मालिकेतील अर्चनाच्या या अंकिताच्या भूमिकेने तिला अनेक पुरस्कार मिळाले. ही मालिका केवळ पाच वर्षे प्रसारित झाली असली तरी तिचा लोकांवर प्रभाव राहिला. विशेष म्हणजे या मालिकेतील तिच्या सशक्त भूमिकेमुळे अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा मार्ग मिळाला आणि तेव्हापासून अंकिताने मागे वळून पाहिले नाही. मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’, ‘बागी 3’, आणि अलीकडेच रिलीज झालेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ यासारख्या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून अंकिताने बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवली. आता ती आगामी मालिकेत आम्रपाली, प्रसिद्ध आणि ग्लॅमरस नागरवधूची भूमिका साकारण्यासाठी तयारी करत आहे.