महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर (फोटो- सोशल मीडिया)
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सादर केला अर्थसंकल्प
यंदा अर्थसंकल्प अजित पवारांना समर्पित – फडणवीस
CM Devendra Fadnavis Live: आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय काय घोषणा केल्या आहेत, ते जाणून घेऊयात.
यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून मांडण्यात आल्याचे दिसून येत आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले गेले असल्याचे पाहायला मिळत आहे.
1. गोपीनाथ मुंडे अपघात अनुदान योजनेचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे शेतमजुरांना विमा संरक्षण मिळणार आहे.
2. शेतात जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजना सुरू केली जाणार आहे.
3. महाराष्ट्र राज्यात नैसर्गिक शेती अभियान राबवले जाणार आहे.
4. ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा सुरू केला जाणार आहे. त्यामध्ये 23 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहे.
5. कृषि विद्यापीठांमध्ये ‘एआय’ची मदत घेतली जाणार आहे.
6. मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी यासाठी 1 कोटी रुपयांची विशेष योजना राबवली जाणार आहे.
7. पुढील काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे.
फडणवीस बजेट मांडताना काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बजेट सादर करताना म्हणाले, “जब हौसला बना लिया ऊँची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का… मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनमुळे उत्पन्नात वाढ होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम करणार. हायस्पीड ट्रेन दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार. प्रगतशील शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन हे बजेटचे 4 स्तंभ आहेत. दिवंगत अजित पवारांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.”
Maharashtra Budget Live: “…फिर देखना फिजूल है कद आसमान का”; फडणवीस बजेट मांडताना काय म्हणाले?
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव रण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. पुडील 5 वर्षात राज्याला भरीव निधी दिला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी एकात्मिक परिसंस्था निर्माण केली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि रणनीतीचे प्रतीक आहे. पर्यटकांच्या सुरक्षित व पर्यावरणपूरक प्रवासाकरिता मुनावळे ते वासोटा रोप वे प्रकल्प करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.”






