अंकुश चौधरीच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी खास गिफ्ट, ‘महादेव’चा मोशन पोस्टर रिलीज
कधी ‘रोमँटिक हिरो’, कधी ‘अँग्री यंग मॅन’ तर कधी ‘विनोदी भूमिका’ साकारणाऱ्या महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार अंकुश चौधरीचा आज (३१ जानेवारी) वाढदिवस आहे. वयाची पन्नाशी गाठली तरीही अंकुश चौधरी अजूनही चॉकलेट हिरोच दिसतोय. तो आज ५२ वा वाढदिवस सेलिब्रेट करतोय. अभिनेता अंकुश चौधरीने आपल्या फिल्मी करियरमध्ये, दोन दशक टीव्ही, चित्रपट आणि नाटक अशी माध्यमे गाजवली आहेत. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अंकुश चौधरीने आपल्या वाढदिवशी एका जबरदस्त चित्रपटाची घोषणा केली आहे.
अंकुश ने आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीला दिले. त्याच्या लुक आणि अभिनयावर असंख्य चाहते फिदा असतात. आता अशातच अंकुश चौधरीने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक दमदार गिफ्ट दिले आहे. अंकुश चौधरीने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रेक्षकांना अकुंशचा धमाकेदार अभिनय पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. वाढदिवसानिमित्त ‘महादेव’च्या संपूर्ण टीमने नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित करून अंकुशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
LGBTQ समाजाच्या हक्कासाठी झगडणारा नक्षत्र बागवे आहे तरी कोण ? जाणून घ्या सविस्तर
स्वामी मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स निर्मित, तेजस लोखंडे दिग्दर्शित ‘महादेव’च्या या नवीन मोशन पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. पोस्टरमध्ये अंकुश चौधरी लढवय्या रूपात दिसत आहे. अंकुशचा हा नवा अवतार जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.