"शोषितांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करणारा हा खरा योद्धा !" अभिनेता किरण मानेंची पोस्ट व्हायरल
आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज ६८ वी पुण्यतिथी. ६ डिसेंबर १९५६ रोजी अवघ्या जगाला ते पोरकं करुन निघून गेले. या महामानवाने देशासाठी आणि देशातल्या माणसांसाठी अनेक असामान्य अशी काम केली आणि त्यांचे आयुष्य सुंदर बनवले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आहे, ते भारताचे पहिले केंद्रीय कायदेमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
अरे देवा! ‘पुष्पा 2’ पाहण्यासाठी गेलेल्या चाहत्यांचा रेल्वेखाली मृत्यू, घाईघाईत घडला अपघात!
अशा महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक आणि सिनेसृष्टीतून त्यांना अभिवादन केले जात आहे. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत बिग बॉस मराठी ४ फेम किरण मानेने खास एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने खास आपल्या शैलीत महामानवाला अभिवादन केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक जुना फोटो शेअर करत अभिनेत्याने एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिलंय की, “याच्यापेक्षा देखणा ‘हिरो’ मी आयुष्यात पाहिलेला नाही भावांनो… नादखुळा ॲटिट्युड. हजारो वर्ष चालत आलेल्या वर्चस्ववादावर लाथ घालून शोषितांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करणारा हा खरा योद्धा ! जात, धर्म, वंश, पंथ, रूढी, परंपरा, रंग, भाषा, वेश, अन्न, इतिहास, भुगोल, हवामान, तापमान सगळ्या-सगळ्या बाबतीत प्रचंड विविधता असलेल्या या भूभागाला एक अखंड ‘देश’ म्हणून एकत्र बांधणारा… स्वातंत्र्य-समता-बंधुता-न्याय ही मुल्यं देऊन प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा विकास करण्याचा अधिकार देणारं संविधान लिहिणारा खराखुरा महानायक ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर… विनम्र अभिवादन.” अशा शब्दात किरण मानेने बाबासाहेबांना मानवंदना दिली आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत बाबासाहेबांना अभिवादन करत आहे.
Pushpa 3: The Rampage मध्ये काय असेल कथा, पुष्पा 2 मध्येच झाले उघड?