मुंबई – कला, दिग्दर्शन व सिनेसृष्टीतून एक मोठी व धक्कादायक बातमी समोर येत आहे. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आत्महत्या केली आहे. (Nitin Desai Sucide) कर्जतमधील एन डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नेमकी कोणत्या कारणामुळं त्यांनी आत्महत्या का केली. हे समजू शकले नाही. नितीन देसाई यांनी अनेक चित्रपट केले आहेत. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई यांनी मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीला (Hindi Cinema) एका वेगळ्या वळणावर व उंचीवर घेऊन गेले होते. तसेच त्यांनी अनेक प्रसिद्ध चित्रपट केले होते. पण त्यांनी एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण समजू शकले नाही. (art director nitin desai committed suicide mourning in the film industry)
एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या ही न पचवणारी धक्कादायक बातमी असल्याचं कलाकारांनी म्हटलं आहे. कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत नितीन देसाई यांनी आपले आयुष्य संपवले आहे. सकाळी सफाई कामगार स्टुडिओत गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.
सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट केले
दरम्यान, नितीन देसाई यांनी अनेक प्रसिद्ध हिंदी चित्रपट तसेच ऐतिहासिक मालिका केल्या आहेत. नितिन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते. ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट सिनेमाचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं. नितिन देसाई हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव होतं.