पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इशाक दार यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) अमेरिका-इराणमध्ये तणाव कमी करण्यासाठी भूमिका बजावू शकतात. त्यांनी दावा केला आहे की, दोन्ही देशात कुटनीतिक चर्चा आणि सुरक्षा संवाद घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबतही याबाबत चर्चा झाली असल्याचे दार यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, या चर्चेत अमेरिका-इराण अणु वाटाघाटी चर्चा सराकारत्मपणे पार पडली आहे.
मात्र पाकिस्तानच्या या भूमिकेवर सोशल मीडियावर जगभरातून टीका केली जात आहे. सध्या पाकिस्तान तालिबानशी संघर्ष करत आहे. तालिबानने पाकिस्तानला धूळ चारली असून सीमेत घुसून अनेक महत्वाच्या पोलिस चौक्यांवर ताबा मिळवला आहे. शिवाय पाकिस्तान देशांतर्गत समस्यांचाही सामना करत आहे.
देशातील अंतर्गत अडचणी आणि आर्थिक स्थिरतेत असलेला पाकिस्तानची मध्यस्थीची ऑफर हास्याची पात्र ठरली आहे. अनेकांनी आधी स्वत:च्या घरातील वाद सोडवा मग दुसऱ्याचा घरात डोकावा, खायला नाही दाणा अन् अमेरिका-इराणमध्ये मध्यस्थीचा बाणा?, आता हे दहशतवादी शांतात निर्माण करणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पण सध्या पाकिस्तानच्या या भूमिकेवर इराण किंवा अमेरिका-इस्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात युद्ध छेडले आहे. अमेरिका-इस्रायलला इराणचा अणु कार्यक्रम बंद करायचा आहे. परंतु इराणला हे मान्य नाही. इराणने त्यांचा अणु कार्यक्रम लोकांच्या कल्ल्याणासाठी असल्याचे म्हटले आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते इराण अण्वस्त्रे तयार करत असून भविष्यात अमेरिका आणि संपूर्ण जगाला अणु हल्ल्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ऑपरेशन एपिक फ्युरी सुरु करण्यात आले होते. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायलने इराणवर हल्ला करुन याची सुरुवात केली. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हे युद्ध अधिक पेटले आहे.






