Aryan Khan : बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shahrukh khan) गेली अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये काम करत आहे आणि आजही त्याचे चाहते आणि त्याची क्रेझ कायम आहे. शाहरुख खानसोबत त्याचे संपूर्ण कुटुंबही प्रसिद्धीच्या झोतात राहिले आहे. सुहाना खान (Suhana Khan) आणि आर्यन खानची (Aryan Khan) ही शाहरुखची दोन्ही मुले आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत हे तुम्हाला माहीत असेल. सुहाना लवकरच नेटफ्लिक्स रिलीज ‘द आर्चीज’मधून अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आर्यन खानने पदार्पण केले आहे. आर्यन खानने अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. शाहरुख खानच्या मुलाने त्याची पहिली जाहिरात फिल्म बनवली आहे ज्यात स्वतः शाहरुख खानने काम केले आहे.
आर्यन खानचे दिग्दर्शक म्हणून पदार्पण
शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मोठा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. आर्यन खानने त्याचे वडील, सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानला घेऊन लक्झरी स्ट्रीटवेअरसाठी एक जाहिरात दिग्दर्शित केली आहे. या एक मिनिटाच्या जाहिरातीच्या फिल्मचा व्हिडिओ काही वेळापूर्वीच रिलीज करण्यात आला.
शाहरुख खानने लेकाच्या जाहिरातीत केले काम
‘D’yavol’ ब्रँडबद्दल हा स्वत: आर्यन खानने सुरू केला आहे. यामध्ये मर्यादित रिलीज लक्झरी स्ट्रीटवेअर विकले जातील. जो स्वतः आर्यन खानने सुरू केला आहे आणि ज्यामध्ये मर्यादित रिलीज लक्झरी स्ट्रीटवेअर विकले जातील. या ब्रँडच्या जाहिरातीचे दिग्दर्शन स्वत: आर्यनने केले आहे आणि त्याने या जाहिरातीत कामही केले आहे. हे आर्यन खानचे पहिले प्रोजेक्ट असून त्याचे कुटुंब, मित्र आणि चाहते त्याच्यासाठी खूप खूश आहेत.
आर्यन खानने जिंकली चाहत्यांची मनं
शाहरुख खान पेंट ब्रश उचलतो आणि आर्यन खानने बोर्डवर जे काही लिहिले आहे ते काळजीपूर्वक वाचतो. यानंतर, तो पेंट ब्रशने बोर्डवर X चिन्ह बनवतो. ब्रँडचे नाव पूर्ण करून तो हसतो आणि तिथून निघून जातो. या व्हिडिओमध्ये आर्यन खानने आपल्या अभिनय कौशल्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
आर्यन खानला दिग्दर्शनात रस आहे
आर्यन खानला वडील शाहरुख खानप्रमाणे अभिनय करण्यात रस नसून दिग्दर्शनात रस असल्याची माहिती आहे. आर्यनने काही काळापूर्वीच त्याची पहिली वेब सीरिज पूर्ण केली आहे, ज्याचे दिग्दर्शन तो स्वत: करणार आहे. ही वेबसीरिज शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरखाली तयार केली जाणार आहे.
शाहरुख खानचे चित्रपट
शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याच्या ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी तो काश्मीरमध्ये शूटिंग करत आहे. याशिवाय शाहरुख खान लवकरच जवान या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी जून महिन्यात थिएटरमध्ये दाखल होणार आहे.