ashok mama colors marathi serial latest update
कलर्स मराठीवरील ‘अशोक मा.मा.’ ही मालिका नात्यांतील गुंतागुंतीच्या धाग्यांवर नेमकं भाष्य करत असल्याने प्रेक्षकांच्या मनाला भिडते आहे. मालिकेने नुकताच २०० भागाचा पल्ला गाठला आहे. आगामी भागात कुटुंबात एक तणावपूर्ण प्रसंग उभा राहणार आहे, जेव्हा छोटा ईशान अचानक घरातून निघून जातो. शाळेत त्याला “अनाथ” असल्याचं म्हणत चिडवलं जात असल्याने त्याच्या मनात खोलवर त्यागोष्टीचा परिणाम झाला आहे. आणि त्यात तो एकट्याच बाहेर पडतो. आता घरचे त्याचा शोध कसा घेणार ? अशोक मामा ईशानची समजूत कशी काढतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. पहा ‘अशोक मामा’ २९ जून दु. २:३०, रात्री ८:३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.
पिंगा गर्ल्सला मिळणार नवा चॅलेंज, वल्लरीच्या सासुबाईंचा कसा करणार सामना ?
कुटुंबात एकीकडे नोकरी, जबाबदाऱ्या, पालकत्व आणि नातेसंबंध यांची घडी बसवण्याचे प्रयत्न सुरू असताना, ईशान एका क्षणी एकटाच घराबाहेर निघून जातो. घरच्यांना जेव्हा त्याच्या अनुपस्थितीची जाणीव होते, तेव्हा घरात अस्वस्थता आणि घबराट पसरते. भैरवी, अनिश आणि मामा ईशानच्या शोधासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मामा संयमाने शोधाची सूत्रं हातात घेतात. मामा पुन्हाएकदा घरचा आधार बनतात.
“मुंबई लोकल”मध्ये फुललेली प्रेमकथा लवकरच रूपेरी पडद्यावर दिसणार, रिलीज डेट आली समोर
सर्वत्र शोधाशोध आणि चिंता वाढलेली असताना, अशोक मामा एक सशक्त स्तंभ ठरतात. अनेक शक्यतांचा विचार करत, ते ईशानपर्यंत कसे पोहचणार? आणि त्याला सुरक्षित घरी कसे घेणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. ईशानच्या मनात काही ना काही सल आहे ते नक्की काय आहे. हे मामांना कळेल ? पहा ‘अशोक मामा’ २९ जून दु. २:३० वा. आणि रात्री ८:३० वा., फक्त आपल्या कलर्स मराठीवर!