vallari mother in law entry pinga girls got new challenge watch video
मैत्री, स्वप्नं आणि संघर्ष यांचा मिलाफ असलेली कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. विविध वयोगटांतील प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या ह्या मालिकेने आता २०० भागांचा टप्पा पार केला आहे. मालिकेमध्ये अनेक घटना घडत आहेत पण आता मालिकेत एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. २०० भागांच्या निमित्ताने मालिकेत ट्विस्ट आला आणि तो म्हणजे वल्लरीची सासू इंदुमती पुन्हा एकदा या दोघांमध्ये फूट पडण्यासाठी थेट मुंबईत येते. मनोज आणि वल्लरीच्या संसाराची स्वप्नं आता साकार होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, वल्लरीची सासू इंदुमती तिच्यावर नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेते.
“भामरेंची सून ड्रेस घालणार नाही,” असं ठणकावून सांगत इंदुमती वल्लरीचे कपडे लपवणार आहेत. इतक्यावरच थांबता ती पिंगा गर्ल्सला एक चॅलेंज देते एका तासात कपडे शोधा, अन्यथा वल्लरीला आयुष्यभर साडी नेसावी लागेल. आता पिंगा गर्ल्स हे चॅलेंज पार करू शकतील का? वल्लरी आपल्या इच्छांवर ठाम राहील का? खरंतर वल्लरीच्या आयुष्याचे निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यावर, तिच्या स्वतंत्र ओळखीवरच हा थेट प्रश्न उपस्थित होतो आहे. हे फक्त पेहरावावरचं टीका नाहीये तर तिच्या व्यक्तिमत्त्वावर, स्वतंत्र विचारांवर केलेला हल्ला आहे. वल्लरीची सासू आता मनोज आणि वल्लरीकडे आली असून तिचा हेतू या दोघांमध्ये फूट पाडणे आहे.
वल्लरीच्या सासुबाईंचा मुळातच त्यांच्या नात्याला विरोध आहे आणि ते तोडण्यासाठी ती मुंबईत आली आहे. मनोजला त्याची आई नको असली तरीही वल्लरीने घातलेल्या अटीमुळे तो त्याच्या आईला घरात राहण्यास परवानगी देतो. आणि इथून इंदुमतीचा वल्लरीला त्रास देण्याला सुरुवात होते. आता वल्लरी आणि पिंगा गर्ल्स कसे इंदुमतीचा सामना करणार ? कसे तिने दिलेले चॅलेंज पूर्ण करणार हे जाणून घेण्यासाठी बघा पिंगा गं पोरी पिंगा दररोज संध्या ७.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.