(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.मोहनलाल यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसोबतच बॉलिवूड आणि भारतीय मनोरंजन विश्वातील अनेक कलाकरांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे. बॉलिवूडचे अमिताभ बच्चन यांनी एक्स पोस्ट करत मोहनलाल यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
एक्स पोस्टमध्ये अभिताभ बच्चन म्हणतात, “मोहनलालजी, तुम्हाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला. हा अत्यंत योग्य सन्मान आहे! खूप खूप अभिनंदन. मी तुमच्या कामाचा आणि अभिनयाचा खूप मोठा चाहता आहे. खोल भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही जी अभिनयाची शैली वापरता ती खरोखरच आश्चर्यकारक आहे. तुम्ही तुमच्या अतुलनीय प्रतिभेने आम्हाला नेहमीच प्रेरणा देता. मी कायमच तुमचा डाय हार्ड फॅन बनून राहीन.”
‘छावा’ सिनेमादरम्यान झालेल्या ट्रोलिंगवर संतोष जुवेकरचा खुलासा, ”माझ्या भावना चुकीच्या पद्धतीने…”
T 5509 – ദാദാ സാഹിബ് ഫാൽക്കെ അവാർഡ് നിങ്ങൾക്ക് ലഭിച്ചതിൽ മോഹൻലാൽ ജി വളരെ സന്തോഷവാനാണ്, അതിയായ സന്തോഷം തോന്നുന്നു – ഏറ്റവും അർഹമായ അംഗീകാരം! ഒരുപാട് അഭിനന്ദനങ്ങൾ. നിങ്ങളുടെ പ്രവൃത്തിയുടെയും കരകൗശലത്തിന്റെയും വലിയ ആരാധകനാണ് ഞാൻ. ഏറ്റവും പ്രകടമായ ചില വികാരങ്ങൾ പ്രകടിപ്പിക്കുന്നതിലെ… pic.twitter.com/8zEXAdflmH
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 21, 2025
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या चाहत्यांचे, सहकाऱ्यांचे आणि मल्याळम चित्रपट उद्योगाचे आभार मानले आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना फोन केला तेव्हा त्यांना कसे वाटले हे अभिनेत्याने व्यक्त केले आहे.
‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’वर क्रांती रेडकरने साधला निशाणा, कारण सिरिजमध्ये समीर वानखेडेचं…
चार दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत, मोहनलाल यांनी विविध शैलीतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २३ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जणार आहे.