(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता एल्विश यादव (Bigg Boss OTT 2 Winner Elvish Yadav) सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. एल्विश यादव हा सुप्रसिद्ध युट्यूबर्स पैकी एक आहे. आता पुन्हा एकदा एल्विश त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. त्याने ‘बिग बॉस १८’ची स्पर्धक चुम दरांग हिच्याविषयी केलेल्या विधानामुळे तो चर्चेत आला आहे. चुम दरांग आता एल्विश यादववर कमालीची संतापली असून तिने ईशान्येकडील लोकांवर विचित्र कमेंट करणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवण्याची मागणीही तिने केली आहे.
दरम्यान, चुम दरांगने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये चुम दरांग म्हणते, “एखाद्याच्या ओळखीची आणि नावाची खिल्ली उडवणे मजेदार गोष्ट नाही. एखाद्याच्या कामगिरीचीही थट्टा करणे हा विनोद नाही. आता विनोद आणि द्वेष यांच्यात रेषा आखण्याची वेळ आली आहे. त्याहूनही दुःखद गोष्ट म्हणजे ते फक्त माझ्या जातीबद्दल नव्हते, माझ्या मेहनतीबद्दल होते आणि संजय लीला भन्साळींसारख्या दूरदर्शी व्यक्तीने बनवलेल्या चित्रपटाचाही अनादर करण्यात आला.”
रणवीर अलाहबादियाच्या अडचणींमध्ये वाढ, प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या पोस्टने वेधले लक्ष!
चूम दरांग पुढे म्हणाली की, “माझ्या ईशान्येकडील लोकांसाठी आणि वंशवादाचा सामना करणाऱ्या सर्वांसाठी. मी तुम्हाला पाहते, ऐकते आणि मी तुमच्यासोबत उभी आहे. आपण सर्वच आदर, प्रतिष्ठा आणि समानतेच्या पात्रतेचे आहोत. चला आपण वंशवादाविरुद्ध आवाज उठवूया आणि सहानुभूती, दया आणि समजूतदारपणाची संस्कृती वाढवूया. #NoRoomForRacism #NotOKWithRacism.”
रजत दलालला दिलेल्या मुलाखतीत एल्विश यादवने करणवीर मेहरा आणि चुम दरांग यांची खिल्ली उडवली होती. तो म्हणाला होता की, “करण वीरला नक्कीच कोविड झाला होता, कारण चुम कशी कोणाला आवडू शकते. आवड कशी काय इतकी वाईट असू शकते ? आणि मुख्य गोष्ट म्हणजे, चुमच्या नावताच अश्लीलता आहे. नाव चुम आहे आणि गंगूबाई काठियावाडीमध्ये काम केलेले आहे.” रजत दलालने सांगितले की, या सर्व गोष्टी स्क्रिप्टेड होत्या.