फोटो सौजन्य - JioHotstar Reality
Bigg Boss 19 Promo : बिग बॉस सुरू होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत पण त्याचा मसाला आता वाढत चालला आहे. बिग बॉसच्या घरातून आत्तापर्यंत एक सदस्य बाहेर झाला आहे त्या सदस्याला सीक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आता बिग बॉसने नॉमिनेशनचा टास्क स्पर्धकांमध्ये खेळण्यात आला होता. या नॉमिनेशनमध्ये सात स्पर्धक नॉमिनेट झाले आहे. आता बिग बॉसच्या सोशल मीडियावर एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये गौरव खन्ना आणि आवेज दरबार हे दोघेही एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत.
प्रोमोच्या सुरुवातीलाच बिग बॉस घोषित करतात की पहिला नॉमिनेशन मध्ये सर्व स्पर्धांचे स्वागत. त्यानंतर आवेज दरबार हा गौरव खन्ना याला नॉमिनेशनमध्ये टाकतो. याचे कारण देताना आवेज दरबार म्हणतो की घरामध्ये कोणतेही काम नसल्यामुळे मी त्याला नॉमिनेट करत आहे. त्यानंतर या प्रोमोमध्ये पुढे असे दाखवण्यात आले आहे की गौरव खन्ना अवेजला प्रश्न करतो की तुझं म्हणणे आहे की नटालियाचा सहभाग हा माझ्यापेक्षा जास्त आहे का? यावर त्यांचे तीव्र संभाषण होते आणि त्यानंतर काही वेळानंतर नगमा मिरजकर आणि अमाल मलिक यांच्यासमोर आवेज दरबार रडताना दिसत आहे. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Nominations task ke baad @darbar_awez huye emotional. Kya banega ab ghar mein ek naya mudda? 🤔
Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @ColorsTV par.#BiggBossOnJioHotstar #BB19OnJioHotstar pic.twitter.com/Jb8v2uaZJ3
— JioHotstar Reality (@HotstarReality) August 26, 2025
पहिल्याच भागात ‘बिग बॉस’च्या अनेक स्पर्धकांनी चाहत्यांची मने जिंकली आहेत. लोकांनी त्यांचा आवडता स्पर्धक निवडण्यास सुरुवात केली आहे. शोच्या सुरुवातीला ज्याला प्रेक्षकांनी पसंती दिली, त्याचा प्रवास सोपा होईल. अशा परिस्थितीत, बीबी हाऊसचे ७ सदस्य शोमध्ये खूप सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. संपूर्ण भागात त्यांचे वर्चस्व दिसून आले. काहींनी त्यांचे मत देऊन प्रसिद्धीझोतात राहिले, तर काहींनी हुशारी दाखवून.
Bigg Boss 19 : या बिग बाॅसच्या स्पर्धकांवर पहिल्याच आठवड्यात टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट
बीबी तक या सोशल मीडिया पेजच्या रिपोर्टनुसार, या आठवड्यात सात हाऊसमेट्सना नामांकन देण्यात आले आहे. यामध्ये अभिषेक बजाज, गौरव खन्ना, झीशान कादरी, नीलम गिरी, तान्या मित्तल, नतालिया जानोसेक आणि प्रणीत मोरे यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या टप्प्यात इतक्या नावांना नामांकन मिळाल्याने शोचा ताण वाढतो. बिग बॉस १९ ची सुरुवात अनेक आश्चर्ये आणि ट्विस्टसह झाली आहे. आता येत्या आठवड्यात हा खेळ कोण पुढे नेतो आणि कोणाचा प्रवास इथेच संपतो हे पाहणे मनोरंजक ठरेल.