(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
The Kerala Story 2 चा टीझर चर्चेत येताच निर्मात्यांनी केला डिलीट? नेमकं सत्य काय आले समोर
घरातील टास्क, वाद आणि मैत्रीच्या समीकरणांमध्ये सचिनने आपली वेगळी छाप पाडली होती. त्याची थेट बोलण्याची शैली, आत्मविश्वासपूर्ण भूमिका आणि खान्देशी अंदाज यामुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे त्याचा प्रवास सहाव्याच आठवड्यात संपल्याने सोशल मीडियावर नाराजीचे सूर उमटले. आहेत. आता अशातच ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच सचिन यांनी नवराष्ट्रासोबत मनसोक्त गप्पा मारल्या आहेत. तसेच घरातील सदस्यांचा खेळ आणि ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले आहे.
घरातून बाहेर पडताच सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या. घरातला दुतोंडी आणि ड्रामा क्वीन कोण आहे? असे विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘मला दुतोंडी व्यक्ती सुरुवातीला सोनाली राऊत वाटायची, परंतु ती लवकर घराबाहेर पडली. आणि आता मला अनुश्री वाटते पण आता तिचा देखील स्वभाव बदलला आहे, मी घराबाहेर पडताना तिला देखील वाईट वाटले. ती स्वतःमध्ये सुधारणा करतेय हे चांगलं आहे.’ असे ते म्हणाले.
तसेच पुढे ‘बिग बॉस’ची नक्कल करताना ते घरामध्ये नक्की कसे बोलतात, ही मिमिक्री करून दाखवताना सचिन कुमावत म्हणाले, ‘काय रे भाऊ सचिन, काय चाली राहिलं तुमलं?, जमी का मले ऐराणी तुम्ही? असेच म्हणतात ‘बिग बॉस’.’ असे सचिन यांनी सांगितले आहे. पुढे गायकाने राखी सावंतची देखील नक्कल केली आहे. आणि ती त्यांना कशी हाक मारते याची मिमिक्री करून दाखवली आहे.
तसेच ‘बिग बॉस’ च्या खेळाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘जसा मी आहे तसाच मी ‘बिग बॉस’च्या घरात राहिलो आहे. सन्मानाने गेलो आणि सन्मानाने घराबाहेर पडलो यामध्येच मी समाधानी आहे.’ असे ते म्हणाले आहेत. सचिनच्या या वक्तव्यावर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस’ घरातील खेळ आता अधिकच रंजक टप्प्यात पोहोचला आहे. पुढील आठवड्यांत कोणते नवे ट्विस्ट येणार आणि कोणाची रणनीती यशस्वी ठरणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.






