बिग बॉस का ठरतोय कंटाळवाणा?
बिग बॉस गेले 17 वर्ष लोकांचा अत्यंत आवडता आणि लोकप्रिय असा रियालिटी शो आहे. मात्र गेल्या तीन वर्षात OTT ही संकल्पना आणल्यानंतर या शो ची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी मोठ्या आशेने अनिल कपूरने होस्टिंग अर्थात निवेदन कसे आहे या उत्सुकतेने अनेकांनी हा सीझन पाहायला घेतला. मात्र अत्यंत टुकार निवेदन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सुमार स्पर्धकांमुळे खरंच हा शो नक्की का पाहावा असा प्रश्न मनात निर्माण झालाय. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
अरमान मलिकवर दया का?
सोशल मीडियावरही यावेळी बिग बॉसच्या या सीझनला बऱ्याच प्रमाणात ट्रोल करण्यात येतंय. 17 सीझन उत्तम खेळ दाखविणाऱ्या सेलिब्रिटीजचा हा शो सध्या वादाचा विषय ठरतोय. याआधीदेखील अनेक वाद निर्माण झाले आहेत. मात्र यावेळी अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी हा सर्वाधिक मोठा वादाचा विषय ठरल्याचे दिसून आले आहे.
समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. इतंकच नाही तर अरमान मलिकने स्पर्धक विशाल पांडेच्या कानाखाली मारल्यानंतरही त्याला घरात ठेवण्यात आले आहे. यावेळी बिग बॉसने नियम का धाब्यावर बसवले आहेत? असा प्रश्नही विचारला जात आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने यावेळी बिग बॉसचा हा खेळ रंगल्याचे चित्र स्पष्ट आहे.
अनिल कपूरची चुकीची बाजू
तुलना करणे कधीही चुकीचे आहे मात्र आतापर्यंत शो निवेदक असणारे सलमान खान, करण जोहर वा फराहा खान यांनी खेळ बघून आपले उत्तम मत दिले आहे आणि स्पर्धकांना योग्य न्यायही दिला आहे. मात्र यावेळी निवेदक असणारा अनिल कपूर कोणत्याही दृष्टीने योग्य ठरत नाही. ना उत्तम निवेदन ना योग्य स्पर्धकाची बाजू असा कोणताही योग्य मुद्दा त्याच्या बाजूने असलेला दिसत नाही.
प्रेक्षकांशी संवादच नाही
अनिल कपूरचेन निवेदन हे प्रेक्षक म्हणून आपलेसे वाटतच नाही. अनिल कपूर केवळ प्रॉम्प्टरवर असणारी वाक्य बोलताना दिसतो असे अनेक बिग बॉस चाहत्यांचे म्हणणे दिसून आले. गेले 17 वर्ष बिग बॉस पाहणारे प्रेक्षक मात्र या सीझनमुळे नक्कीच नाराज झाले आहेत. अनिल कपूरकडून अनेक अपेक्षा होत्या मात्र त्या अपेक्षांचा फुगा पहिल्याच भागात फुटल्याचे दिसून येत आहे.
स्पर्धकांमध्ये उगीच वाद
अनेक स्पर्धकांमध्ये ओढूनताणून वाद असल्याचे दिसून येत आहे. मग अरमान – विशाल असो वा साई – लवकेश असो. तसंच पॉलोमी आणि शिवानीमधील वाददेखील ओढूनताणून केल्यासारखाच वाटला. इतकंच नाही तर शिवानी ही अत्यंत त्रासदायक स्पर्धक असूनही तिला सतत दाखविण्यात येते. स्पर्धकांचा तिला अजिबात प्रतिसाद नाही तरीही तिला दाखविण्यात येते. अनेक ठिकाणी रणवीर शौरी उत्तम काम करत असूनही त्याला चुकीचे दाखविण्यात येत असल्याचेही प्रेक्षकांचे म्हणणे आहे.