I Want to Talk मधली अभिषेक बच्चनने भूमिका का स्वीकारली ? आराध्याचं नाव सांगत म्हणाला...
अभिषेक बच्चन सध्या शुजित सरकार दिग्दर्शित ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. शिवाय, त्याच्या खासगी आयुष्यामुळेही तो चर्चेत आहे. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला असून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेता बराच व्यस्त आहे. अभिषेक बच्चनने नुकतंच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये अभिषेकने त्याची लेक आराध्याबद्दल महत्वाचं विधान केलं आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असताना अभिषेकने लेक आराध्याविषयी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
क्लासी आणि पावरफुल! सोनम कपूरचं बॉसी लूकमधलं रॉयल फोटोशूट चर्चेत
‘आय वॉन्ट टू टॉक’ हा चित्रपट एकट्या बापाच्या भावनिक प्रवासावर भाष्य करतो. जो आपल्या मुलीसोबत राहत असताना त्याच्या आणि मुलीच्या नात्यात अडचणी येतात. अभिषेक म्हणतो की “मी चित्रपटातील पात्रासोबत स्वत:ला काही वचनांसोबत जोडतो. अर्जुन सेन त्याच्या मुलीला वचन देतो की, तो नेहमी तिच्यासोबत असेल.” दरम्यान, अभिषेक आपल्या मुलीचे नाव घेत म्हणतो, “आराध्या माझी मुलगी आहे आणि शूजित दा यांनाही दोन मुली आहेत. आपण सर्व ‘गर्ल डॅड’ आहोत. त्यामुळे लेक आणि वडिलांची भावना आम्ही चांगल्या प्रकारे समजतो.
पुढे अभिनेत्याने म्हटले, “चित्रपटाचे कथानक आवडण्याबरोबरच मला आणखी एक गोष्ट आवडली की, ही कथा एका वडिलांच्या दृष्टिकोनातूनही सांगितली जाणार आहे. एक बाप सांगतो की, मी सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करून मुलीसाठी जगणार आहे. ही गोष्ट खूप प्रेरणादायी होती.”