1 जुलै 1994 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तो प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर खळबळ उडाली. हा चित्रपट दुसरा कोणी नसून राजीव राय दिग्दर्शित ‘मोहरा’ होता. नसीरुद्दीन शाह, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, रवीना टंडन आणि परेश रावल यांच्यासह अनेक कलाकारांची भूमिका असलेला हा चित्रपट त्यावेळी ब्लॉकबस्टर ठरला होता.
रवीनाच्या आधी या अभिनेत्रींना ऑफर्स आल्या
मोहरा हा एक असा चित्रपट आहे ज्यामध्ये प्रेक्षकांना क्राइम, ड्रामा, थ्रिलर, मिस्ट्री, रोमान्स आणि ॲक्शन पूर्णपणे पाहायला मिळाले. राजीव राय यांनी हा चित्रपट श्रीदेवीला पहिल्यांदा ऑफर केला होता, पण तिने तो नाकारला, कारण त्यावेळी ती चंद्रमुखीमध्ये व्यस्त होती. त्यानंतर दिग्दर्शकाने दिव्या भारतीला विचारले आणि तिने या चित्रपटाला होकार दिला.
या चित्रपटाचे थोडेसे चित्रीकरणही झाले होते, परंतु या नंतर अभिनेत्री दिव्या भारतीचा मृत्यू झाला आणि चित्रपट थांबला. दिग्दर्शकाने ऐश्वर्या राय बच्चनचाही विचार केला, पण ती मिस वर्ल्ड स्पर्धेत व्यस्त होती. मग शेवटी हा चित्रपट रवीना टंडनच्या नशिबी आला आणि या चित्रपटाने अभिनेत्रीचे नशीबच बदलले.
चित्रपट बनवण्याची कल्पना जिममध्ये सुचली
IMDb च्या रिपोर्टनुसार, निर्माता गुलशन राय आणि लेखक शब्बीर बॉक्सवाला सुनील शेट्टीच्या जिममध्ये जायचे. एके दिवशी व्यायामादरम्यान शब्बीर बॉक्सवालाच्या मनात एक प्लॉट आला आणि त्याने गुलशन राय यांना सांगितले. तिथून पुढे त्याने मोहराची कथा ॲक्शनपॅक्ड थ्रिलर म्हणून पूर्ण करायला सुरुवात केली.
कोणत्याही बॉडी डबलशिवाय स्टंट केले
अक्षय कुमारला त्याचे चाहते खिलाडी कुमार असेही म्हणतात आणि यामागे एक खास कारण आहे. कलाकार चित्रपटांमध्ये दमदार ॲक्शन करताना दिसला होता. काही चित्रपटांमध्येही त्याने बॉडी डमीशिवाय सीन केले आहेत आणि मोहरा त्यापैकी एक आहे. या चित्रपटात अक्षयने क्लायमॅक्समध्ये 100 फूट उंच टॉवरवरून उडी मारण्यासह त्याचे सर्व स्टंट स्वत: कोणत्याही बॉडी डमीच्या मदतीशिवाय केले आहेत.
हा चित्रपट हॉलिवूडपासून प्रेरीत
‘मोहरा’ चित्रपटाची कथा ‘हार्ड बॉइल्ड’ आणि ‘डेथ विश 4: द क्रॅकडाउन’ या दोन हॉलिवूड सिनेमांपासून प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाचे ॲक्शन सीनसुध्दा या हॉलिवूड चित्रपटांपासून प्रेरीत झाला आहे.
102 डिग्री तापामध्ये शॉट करण्यात आला
या चित्रपटातील टिप टिप बरसा पानी हे गाणे लोकांना खूप आवडले, पण फार कमी लोकांना माहीत असेल की, अभिनेत्रीने हे गाणे 102 डिग्री तापात शूट केले होते. रवीनाने स्वतः इंडिया बेस्ट डान्सर शोमध्ये सांगितले होते की, तिला या गाण्याच्या वेळी इंजेक्शन घ्यावे लागले. पावसामुळे ती आजारी पडली. तरीही या चित्रपटामधील हा सीन आणि गाणे पूर्ण चित्रीत करण्यात आले.