(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी २९ वर्षांच्या लग्नानंतर १९ नोव्हेंबर रोजी घटस्फोटाची घोषणा केली. चाहत्यांना हे सत्य अजूनही पचतच होते की योगायोगाने त्याच दिवशी रहमानच्या ग्रुपमधील एक सदस्य मोहिनी डे, जी त्याच्यासोबत वर्षानुवर्षे परफॉर्म करत होती, तिनेही तिच्या पतीपासून वेगळे होण्याची घोषणा केली. अचानक एकामागून एक या बातम्या ऐकून अनेक चाहते रेहमान आणि मोहिनी यांच्यात काही नातं असल्याचं कनेक्शन बनवत होते. आता रहमान आणि सायरा यांच्या कायदेशीर सल्लागाराने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. प्रतिनिधीने त्यांच्यातील कोणतेही संबंध नाकारले आहेत.
वकिलाने उघड केले सत्य
रिपब्लिक टीव्हीशी बोलताना सायराच्या वकील वंदना शाह म्हणाल्या, ‘रहमान आणि सायरा यांच्या घटस्फोटाशी मोहिनीचा काहीही संबंध नाही. सायरा आणि मिस्टर रहमान यांनी स्वतः हा निर्णय घेतला आहे. रहमान आणि सायरा बानो यांनी मंगळवारी संध्याकाळी वेगळे होण्याची घोषणा केली होती. त्यांनी त्यांच्या नात्यातील तणाव हे त्यांच्या विभक्त होण्याचे कारण सांगितले आहे.’
कोण आहेत मोहिनी डे?
29 वर्षांची मोहिनी ही कोलकात्याची बास प्लेअर आहे. ती बंगालच्या विंड ऑफ चेंजचा भाग आहे. तिने रहमानसोबत जगभरातील 40 हून अधिक शोमध्ये परफॉर्म केले आहे. तिने मंगळवारी इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये तिचा संगीतकार पती मार्क हार्टशपासून वेगळे झाल्याची घोषणा केली.
मोहिनीने लिहिले, ‘जड अंतःकरणाने, मार्क आणि मी घोषणा करतो की आम्ही वेगळे झालो आहोत. सर्वप्रथम, आम्ही आमच्या मित्र आणि कुटुंबियांशी केलेली बांधिलकी लक्षात घेऊन आम्ही परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे. आमच्यात परस्पर समज आहे. मात्र, यादरम्यान आम्ही एकमेकांचे चांगले मित्र राहू. आम्हा दोघांनाही आमच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी हव्या आहेत. सहमतीने विभक्त होणे हा सर्वोत्तम मार्ग होता.’ असे तिने लिहून सोशल मीडियावर शेअर केले.
रहमान आणि सायरा आहेत ३ मुलांचे पालक
संभाषणात वंदना शाह यांनी असेही सांगितले की, रहमान आणि सायरा बानू यांच्या विभक्त होण्याच्या काळात आर्थिक विषयांवर कोणतीही चर्चा झाली नाही. याबाबत ते म्हणाले, ‘हा घटस्फोट शांततेत झाला असून दोघांनीही हा निर्णय गांभीर्याने घेतला आहे. हे फसवे लग्न नाही. रहमान आणि सायरा बानोचे १९९५ मध्ये लग्न झाले. दोघांना तीन मुले आहेत.’ असे त्यांनी सांगितले.