(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि हिट चित्रपट निर्माते अॅटली यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली तेव्हा चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. दोघेही स्वतःच्या बळावर सुपरहिट चित्रपट देण्यासाठी ओळखले जातात. आता, हे दोघे एका मेगा प्रोजेक्टसाठी एकत्र येत आहेत ज्याची निर्मिती सन पिक्चर्स करत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे बजेट खूप जास्त असणार आहे. हे दोघेही भारतातील सर्वात महागडा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे. तसेच भारतातील पहिला आणि दुसरा सर्वात महागडा चित्रपट कोणता हे आपण जाणून घेणार आहोत.
अल्लू अर्जुन आणि अॅटली यांच्या चित्रपटाचे बजेट किती आहे?
सध्या, हा चित्रपट AA22 X A6 म्हणून ओळखला जात आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट भारतातील तिसरा सर्वात महागडा चित्रपट बनू शकतो. पहिल्या क्रमांकावर एसएस राजामौली आणि महेश बाबू यांचा ‘एसएसएसबी २९’ हा चित्रपट आहे, ज्याचे बजेट १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, दुसऱ्या क्रमांकावर रणबीर कपूरचा ‘रामायण’ हा चित्रपट आहे ज्याचे बजेट सुमारे ९०० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते आहे. आणि आता AA22 X A6 चित्रपटाचे बजेट सुमारे 800 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे.
सोनू कक्करचा बहीण नेहासोबत नातं तोडण्याचा होता पीआर स्टंट? नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया!
या चित्रपटाच्या निर्मितीसाठी २०० कोटी रुपये, व्हीएफएक्स (स्पेशल इफेक्ट्स) साठी २५० कोटी रुपये, अल्लू अर्जुनचे मानधन १७५ कोटी रुपये आणि अॅटलीचे मानधन १०० कोटी रुपये असेल असे वृत्त आहे. याशिवाय, अल्लू अर्जुनला चित्रपटाचा १५% नफा हिस्साही मिळणार आहे आणि अॅटलीला बॅकएंड डील देखील देण्यात आली आहे.
हा चित्रपट जागतिक स्तरावर बनवला जणार
AA22 X A6 हा चित्रपट एक जबरदस्त दृश्य अनुभव देणार आहे. ‘अवतार’ आणि ‘आयर्न मॅन’ सारख्या हॉलिवूड चित्रपटांवर काम केलेले तज्ज्ञ त्यात काम करणार आहेत. असा विश्वास आहे की हा चित्रपट एका काल्पनिक जगावर आधारित असेल ज्यामध्ये विचित्र प्राणी आणि अनोखी ठिकाणे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच अॅटलीच्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्यांनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन दुहेरी भूमिकेत दिसेल अशी प्रेक्षकांची इच्छा आहे.
‘इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं’, नजरेत घायाळ करणारं सईचे सौंदर्य!
शूटिंग कधी सुरू होणार?
या मेगा चित्रपटाचे चित्रीकरण ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. ८ एप्रिल रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी या चित्रपटाचा एक छोटासा टीझरही प्रदर्शित करण्यात आला, ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. हा चित्रपट संपूर्ण भारतातील प्रेक्षकांना लक्षात घेऊन बनवला जात आहे आणि जागतिक आकर्षणासह प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.