मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या मराठी आणि हिंदी मधील नवनवीन येणाऱ्या आगामी प्रोजेक्टसाठी चर्चेत आहे. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तसेच, ती अनेक वेळा इंटरनेटवर नवनवीन पोस्ट शेअर करताना दिसत असते. याचदरम्यान आता सईने स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती खूप आकर्षित आणि सुंदर दिसत आहे. सईचा आता लवकरच हिंदी चित्रपट ‘ग्राउंड झिरो’ मध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये ती सुप्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. तसेच मराठी चित्रपट 'गुलकंद' देखील लवकरच रिलीज होणार आहे.
'इन आँखों की मस्ती के मस्ताने हज़ारों हैं', नजरेत घायाळ करणारं सईचे सौंदर्य (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांच्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिला चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी देखील कंमेंट केल्या आहेत.
सईने शेअर केलेल्या या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर कॉर्ड सेट परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच मोहक दिसत आहे. तसेच सईचा हा लुक कोणत्याही पार्टी लुकसाठी परफेक्ट आहे.
सईने शेअर केलेल्या या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर कॉर्ड सेटवर अत्यंत साधा आणि आकर्षित मेकअप केले आहे. ज्यामध्ये तिने गुलाबी लिप्सटिप, डोळ्यांचा रेखीव मेकअप आणि जाड भोवल्या ठेवल्या आहेत.
सईने या कॉर्ड सेटवे केसांची सुंदर हेअर स्टाइल केली आहे. अभिनेत्रीने स्वतःचे काळेभोर केस कुरळे केले आहे. जे तिच्या आऊट फिट वर खूप शोभून दिसत आहे.
सईने या सुंदर पांढऱ्या ड्रेसवर गोल्डन ज्वेलरीचा समावेश केला आहे. तसेच तिने हातात गोल्डन मोत्याची आंगठी घातली आहे. सईचा हा परिपूर्ण लुक चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.