(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. सकाळपासूनच सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटींच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. प्रत्येकजण आपापल्या अनोख्या पद्धतीने किंग खानला शुभेच्छा देत आहे. दरम्यान, रॅपर बादशाह आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वाधिक चर्चेत आहेत.
बॉलिवूडचा “खिलाडी कुमार”, अक्षय कुमारनेही शाहरुख खानला खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्याने त्याचा आणि किंग खानचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे.
अक्षय कुमारनेशाहरुख खानसोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले, “या खास दिवसासाठी तुझं खूप खूप अभिनंदन शाहरुख. ६० वर्षांचा तर तू कसाही वाटत नाहीस. शकल से ४०, अकल से १२०…, हॅपी बर्थडे दोस्त.” तर दुसरी कडे रॅपर बादशाहने देखील शाहरूखला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
Many, many congratulations on your special day, Shahrukh. 60 ka lagta nahi hai vaise tu kahin se. Shakal se 40, akal se 120 😉
Happy Birthday dost. Stay blessed @iamsrk ✨💙 pic.twitter.com/XGAJWwjV92 — Akshay Kumar (@akshaykumar) November 2, 2025
रॅपर बादशाह त्याच्या इंस्टाग्रामवर शाहरुख खानचा फोटो असलेला काळा टी-शर्ट घातलेला एक फोटो शेअर केला. त्याने काळा डेनिम, सनग्लासेस आणि पिवळ्या स्नीकर्सने हा लूक पूर्ण केला.बादशाहने फोटोला कॅप्शन दिले, “तो माझी दुनिया आहे!” या ओळीने चाहत्यांची मने जिंकली. पोस्ट लवकरच व्हायरल झाली, लोकांनी कमेंट केली, “दोन बादशाह,” चाहत्यांनी या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. या दोघांनी दिलेल्या शुभेच्छा लोकांना खूप आवडल्या असून लोक या पोस्टवर हार्ट इमोजी पाठवत आहेत
शाहरुख खानचे चाहते त्याच्या मुंबईतील घर, मन्नत बाहेर जमले आहेत. दरवर्षीप्रमाणे, लोक बॅनर, पोस्टर आणि केक घेऊन त्यांच्या स्टारचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले आहेत.
शाहरुखने आपला ६० वा वाढदिवस अलिबाग येथे साजरा केला. या जंगी सेलीब्रेशनमध्ये फिल्म इंडस्ट्रीतील मोठा मित्रपरिवार उपस्थित होता. रात्रीपासूनच पार्टी रंगली आणि काही वेळा आधीच शाहरुख मुंबईकडे रवाना झाला.त्याच्या ‘मन्नत’बंगल्याबाहेर चाहत्यांची रांग अजूनही पहाटेपासून सुरू आहे, ज्यात चाहते शाहरुखला पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.






