फोटो सौजन्य : सोशल मीडिया
सध्या आलिया भट्ट तिचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘अल्फा’वर काम करत आहे. स्पाय युनिव्हर्स चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. आलिया भट्ट बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलसोबत एक ॲक्शन सीन शूट करत आहे. आलिया आणि चित्रपटाचा खलनायक बॉबी देओल सध्या मुंबईत आहेत. जिथे ते फिल्मसिटीच्या एका अत्यंत सुरक्षित सेटवर शूटिंग करत आहेत.
आलिया भट्ट ‘अल्फा’ हा चित्रपट लवकरच येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला. आलियादेखील आता हेरगिरीच्या रोमांचक जगात सामील झाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अंधेरीतील YRF स्टुडिओमध्ये शूटिंग सुरू झाले आणि आता युनिट गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये स्थलांतरित झाले आहे. जिथे 100 बॉडीगार्ड तैनात करण्यात आले आहेत. आता आलिया आणि बॉबी एका ॲक्शन पॅक सीक्वेन्ससाठी शूटिंग करत आहेत. जो एक क्रूर असा ॲक्शन सीक्वेन्स असल्याचे सांगितले जात आहे.
या ॲक्शन सीक्वेन्ससाठी आलिया भट्ट आणि बॉबी देओल हाता पाईच्या लढाईपासून ते शस्त्रांचा वापर करण्यापर्यंत सर्व काही करतील. शूटिंग चार दिवस चालेल आणि निर्माते आदित्य चोप्रा यांनी याची खात्री केली आहे की, सेटवर कडक सुरक्षा आहे की नाही हे पहिले जाईल आणि चित्रपट लीक होऊ नये म्हणून 100 लोक सेटवर पहारा देतील.
चित्रपटाची दृश्ये अत्यंत सुरक्षित सेटवर शूट केली जात आहेत. ज्याची रचना कला दिग्दर्शक अमित रे आणि सुब्रत चक्रवर्ती यांनी काळजीपूर्वक केली आहे. वन-ऑन-वन फाईटसाठी आलियाने काळे कपडे घातलेले आहेत आणि तिच्या मांडीला बंदूक बांधलेली आहे. तर बॉबीने कापलेले केस आणि रॉक सॉल्ट अँड पेपर बिअर्ड लूकमध्ये
या चित्रपटात आलिया भट्ट तिच्या मार्शल आर्टचे प्रात्यक्षिक करताना दिसणार आहे. शिव रवैल दिग्दर्शित ‘अल्फा’ हा YRF स्पाय युनिव्हर्सचा नवीन चित्रपट आहे आणि त्यात शर्वरी वाघ देखील आहे. या चित्रपटात शर्वरीही ॲक्शन अवतारात दिसणार आहे. केसी ओ’नीललाही या चित्रपटाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याने ‘जवान’ (2023), ‘टॉप गन: मावेरिक’ (2022) आणि ‘जॅक रीचर’ (2012) सारख्या हिट चित्रपटांसाठी ॲक्शन सीक्वेन्स डिझाइन केले आहेत.