बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानला त्याचे ९ कोटी रुपये परत मिळू शकतात. हे प्रकरण महाराष्ट्र सरकार आणि शाहरुख खानच्या बंगल्या ‘मन्नत’शी संबंधित आहे. अशा परिस्थितीत, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकार अभिनेता शाहरुख खानच्या याचिकेला/अर्जाला मंजुरी देऊ शकते, ज्यामध्ये त्याने ९ कोटी रुपये परत करण्याची मागणी केली होती.
शाहरुख खानच्या म्हणण्यानुसार, ही मोठी रक्कम मुंबई उपनगरीय जिल्ह्याच्या (एमएसडी) जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे ‘मन्नत’ हे घर ज्या जमिनीवर बांधले आहे त्या जमिनीसाठी अतिरिक्त देयक म्हणून देण्यात आली होती.
शासनाकडून मंजुरी
वांद्रे पश्चिम येथील अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या संयुक्त मालकीचा हा विशाल निवासी बंगला राज्य सरकारने मूळ मालकाला भाड्याने दिलेल्या भूखंडावर आहे. अभिनेता आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या ‘मन्नत’ या घरासाठी अतिरिक्त देय म्हणून मागितलेले पैसे परत केल्यानंतर सरकारने या कराराला मंजुरी दिली असल्याचे आता समोर आले आहे. शाहरूख खानने यासंदर्भात कोर्टात याचिका सादर केली होती आणि त्यानुसार हा निर्णय त्याच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.
रेडी रेकनर
२,४४६ चौरस मीटरमध्ये पसरलेली ही मालमत्ता शाहरुख आणि गौरी खान यांच्या नावावर नोंदणीकृत कराराद्वारे हस्तांतरित करण्यात आली. यापूर्वी, महाराष्ट्र सरकारने, मूळ मालकी हक्कधारक असल्याने, त्यातून मिळणाऱ्या अनर्जित उत्पन्नाचा वाटा लादला होता, जो बाजार मूल्य आणि रेडी रेकनर व्हॅल्यू (RRR) मधील फरकाच्या आधारे मोजला जातो.
शाहरुख खानने नंतर राज्य सरकारच्या धोरणाचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला जो भाडेतत्त्वावरील मालमत्तेचे (वर्ग २) पूर्ण मालकीमध्ये रूपांतर करण्यास परवानगी देतो (वर्ग १). दोघांनीही मार्च २०१९ मध्ये सरकारी धोरणानुसार रेडी रेकनर किमतीच्या २५ टक्के रक्कम भरली, जी सुमारे २७.५० कोटी रुपये होती.
काय आहे तथ्य?
ही माहिती सध्या सुत्रांच्या माहितीनुसार असून याबाबत अधिक गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. मात्र मंजुरी मिळाली असल्याची माहिती योग्य असून लवकरच शाहरूख खान अधिक श्रीमंत होऊ शकतो हे मात्र नक्की. महाराष्ट्र सरकारकडून शाहरूखला त्याचे 9 कोटी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरण; आरोपीच्या पोलीस कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ; कोर्टाचा निर्णय
शाहरूखचा मन्नत बंगला