(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सुंदर अभिनेत्री अमृता खानविलकर आज तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीला या खास प्रसंगी आज अनेक मोठमोठ्या कळकरांसह चाहते देखील शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत. तसेच या खास दिवशी तिच्या अत्यंत जवळचा व्यक्ती म्हणजेच तिचा पती हिमांशूने तिला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर हिमांशूने अमृताच्या फोटोसह एक व्हिडीओ शेअर केला आहे. जी पाहून चाहत्यांना तो खूप आवडला असून, त्याला खूप प्रतिसाद देत आहेत.
हिमांशूने शेअर केली पोस्ट
अहिनेत्री अमृताच्या वाढदिवसानिमित्त पती हिमांशू मल्होत्राने एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि त्याचबरोबर त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अमू. माझ्या गोड शुभेच्छा कायम तुझ्याबरोबर असतील. तू दिवसेंदिवस प्रगती करतेय आणि यासाठी मला तुझा प्रचंड अभिमान आहे…हा अभिमान मला कायम वाटत राहील. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…आयुष्यात तुला भरभरून प्रेम मिळत राहो. ढेर सारा प्यार.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे. अमृताने हिमांशू मल्होत्रासोबत २०१५ मध्ये लग्न केले. आणि चाहत्यांना चकित करून टाकले.
अमृताची मराठी सिनेमाची कारकीर्द
२००४ मध्ये अमृताने ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स खोज’ या शोमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. यानंतर तिने मराठी चित्रपट ‘गोलमाल’ मधून मराठी सिनेमा इंडस्ट्रीत पदार्पण केले. या संपूर्ण काळात आपल्या दमदार अभिनयासह अमृताने तिच्या नृत्याने देखील चाहत्यांचे मन जिंकले. यानंतर अभिनेत्रीने अनेक मराठी सुपर हिटचित्रपट देऊन प्रसिद्धी मिळवली आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केले. तसेच तिने मराठीसह अनेक हिंदी चित्रपटामध्येही आपली झलक दाखवली. आणि निर्मात्यांची प्रशंसा मिळवली. तिचा नुकताच २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली करून चाहत्यांना वेडे केले. या चित्रपटामधील गाणीही चाहत्यांना खूप आवडली.
दिवाळीचा मुहूर्तावर अमृताची स्वप्नपूर्ती, म्हणाली, ‘माझं स्वतःच घर – एकम’, 22 व्या मजल्यावर 3BHK
कामाच्या आघाडीवर अमृता खानविलकर बऱ्याच प्रोजेक्ट्सचा भाग होणार असून, ती चाहत्यांसाठी धमाकेदार चित्रपट घेऊन येणार आहे. ज्यामध्ये ‘कलावती’, ‘ललिता बाबर’, आणि पठ्ठे बापूराव यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटामध्ये तिची दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे.