एसएस राजामौली यांचे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत मोठ्या आदराने घेतले जाते. प्रेक्षकांना बाहुबली आणि आरआरआर सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे देणारे एसएस राजामौली, ते आता पुढचा कोणता चित्रपट बनवणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांना सर्वोत्तम ॲक्शन चित्रपट देणाऱ्या एसएस राजामौली यांच्यावर आता चित्रपट बनणार आहे. हे ऐकून त्यांच्या चाहत्यांना भरपूर आनंद झालेला दिसून येत आहे.
एसएस राजामौली यांची डॉक्युमेंट्री होणार प्रदर्शित
एसएस राजामौली हे भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते मानले जातात. लार्जर दॅन लाईफ व्हिज्युअल्ससह लोकांना सिनेमॅटोग्राफीचा अनुभव देणाऱ्या राजामौली यांच्या खऱ्या आयुष्याची झलक दाखवण्यात येणार आहे. खरे तर हा एक डॉक्युमेंटरी चित्रपट असणार आहे. नेटफ्लिक्सने या दिग्गज दिग्दर्शकाचे चरित्र जाहीर करत आहे. यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे.
या दिवशी होणार चित्रपट रिलीज
चित्रपट निर्माता राजामौली यांच्या चरित्रात त्यांच्या जीवनातील अनेक क्षेत्रांचा समावेश दाखवण्यात येणार आहे. विशेषत: चित्रपट जगतातील दिग्दर्शक म्हणून त्यांचे आयुष्य सविस्तरपणे दाखवले जाणार आहे. हा चित्रपट ॲप्लॉज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होणार आहे. या माहितीपटाचे नाव आहे ‘मॉडर्न मास्टर्स: एस.एस. राजामौल’ ही डॉक्युमेंट्री फिल्म नेटफ्लिक्सवर २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तर चाहत्यांना जास्त काळ वाट पाहावी लागणार नसून, तो लवकरच ओटीटी प्रदर्शित होणार आहे.
राणा डग्गुबती याची प्रतिक्रिया
एसएस राजामौली यांच्यावरील आधारित डॉक्युमेंट्रीच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वसामान्यांनीच नाही तर सेलिब्रिटींनीही आनंद व्यक्त केला आहे. ‘बाहुबली’मध्ये भल्लालदेवची भूमिका करणाऱ्या राणा दग्गुबतीने फायर इमोजीसह टिप्पणी केली, ‘माय मास्टर.’ त्याचप्रमाणे एसएस राजामौली यांच्या माहितीपटालाही चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
एकाने लिहिले, ‘त्यानी अनेक अप्रतिम चित्रपट केले आहेत, पण माझा आवडता ‘इगा’ हा चित्रपट आहे! किती अप्रतिम आणि सुंदर चित्रपट आहे. असे त्याने लिहिले या नंतर दुसऱ्याने टिप्पणी केली, ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील महान चित्रपट निर्मात्यांपैकी एक. असे म्हणून सगळ्या चाहत्यांनी टिपणी केली आहे.