(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
९३ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या नामांकनांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय चित्रपट निर्माते गुनीत मोंगा यांचा ‘अनुजा’ हा चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाला आहे. अनुजाने लाईव्ह ॲक्शन शॉर्ट कॅटेगरीत आपले स्थान निर्माण केले आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे ऑस्कर नामांकन पुढे ढकलण्यात आले होते. परंतु या पुरस्कराची घोषणा २३ जानेवारी रोजी करण्यात आली आहे. ‘अनुजा’ या चित्रपटाला नामांकन मिळाल्यामुळे बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा खूप आनंदी झाले आहेत.
‘अनुजा’ हा हिंदी चित्रपट ॲडम जे ग्रेव्हज यांनी दिग्दर्शित केला आहे. तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा या चित्रपटाची कार्यकारी निर्माती होती. प्रियांकासाठी हे एक मोठे यश मानले जात आहे. हा चित्रपट अनुजा नावाच्या ९ वर्षांच्या मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे, जी तिची मोठी बहीण पलकसोबत कापडाच्या कारखान्यात काम करते. या चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट अप्रतिम आहे. या बातमीने चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.
Short on time, big on talent, here are this year’s nominees for Live Action Short Film. #Oscars pic.twitter.com/Wx0TZIpUen
— The Academy (@TheAcademy) January 23, 2025
‘अनुजा’ सोबत हे चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील
‘अनुजा’ सोबतच ऑस्करच्या शर्यतीत आणखी चार चित्रपटांचा समावेश झाला आहे. यामध्ये रोबोट, एलियन, द लास्ट रेंजर आणि अ मॅन हू वूड नॉट रिमेन सायलेंट यांचाही समावेश आहे. यापूर्वी, भारतीय चित्रपट निर्माते गुनीत मोंगा यांच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या चित्रपटाने २०२३ मध्ये ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. आणि आता ऑस्कर २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट कोणाला मिळतो हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.
Rajpal Yadav Father Death: राजपाल यादव यांच्या वडिलांचे निधन, दिल्लीतील AIIMS मध्ये सुरु होते उपचार!
‘अनुजा’ या चित्रपटाची निर्मिती सलाम बालक ट्रस्ट आणि नफा न मिळवणारी निर्मिती कंपनी शाइन ग्लोबल यांनी केली आहे. सलाम बालक ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था दिल्ली-एनसीआरच्या रस्त्यांवर काम करणाऱ्या मुलांना मदत करते. हा ट्रस्ट प्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या मालकीचा आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये, गुनीत मोंगा कार्यकारी निर्माता म्हणून चित्रपटात सामील झाले. यानंतर, जानेवारी २०२५ मध्ये, प्रियांका चोप्रा ‘अनुजा’ या चित्रपटासोबत जोडली गेली.