(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूडचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांसाठी जबरदस्त धमाल करणारा चित्रपट घेऊन आला आहे. साजिद नाडियाडवालाचा बहुप्रतिक्षित ‘बागी ४’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित होणार आहे. उद्या म्हणजेच शनिवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११:११ वाजता डिजिटल प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर अगदी एक आठवडा आधीच प्रदर्शित होत आहे, कारण हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची बऱ्याच दिवसांपासून चाहते वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफनेही त्याच्या चाहत्यांची दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान, नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने चित्रपटाचे एक नवीन आणि दमदार पोस्टर शेअर करून उत्साह वाढवला आहे.
३० ऑगस्ट रोजी सकाळी ११:११ वाजता ट्रेलर होणार प्रदर्शित
साजिद नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने टायगर श्रॉफ, हरनाज संधू, सोनम बाजवा आणि संजय दत्त यांचे एक उत्तम पोस्टर देखील प्रदर्शित केले आहे. पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सर्वात धक्कादायक आणि रक्तरंजित प्रेमकथा सुरू होणार आहे. या जगात प्रत्येक प्रियकर हा खलनायक असणार आहे. बागी-४ चा ट्रेलर उद्या सकाळी ११:११ वाजता प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.’ असे लिहून निर्मात्यांनी ही पोस्ट शेअर करणार आहे.
A-रेटेड एक्शन थ्रिलर होगी बागी-4
हा चित्रपट मागील तीन भागांपेक्षा वेगळा, ए-रेटेड ॲक्शन थ्रिलर असेल, ज्यामध्ये टायगर आणि संजय दत्त यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. ‘बागी ४’ साजिद नाडियाडवाला निर्मित आणि ए. हर्ष दिग्दर्शित आहे. या चित्रपटात हरनाज संधू आणि सोनम बाजवा देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत, जे या फ्रँचायझीमध्ये पहिल्यांदाच पूर्ण-अॅक्शन सीक्वेन्समध्ये दिसतील. ट्रेलर लाँचसह ॲडव्हान्स बुकिंग देखील सुरू होईल, जेणेकरून चाहते ॲडव्हान्स तिकिटे बुक करू शकतील.
Vishal Engagement: साऊथ सुपरस्टार विशालने गुपचूप उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर शेअर केले फोटो
‘बागी’ फ्रँचायझी २०१६ मध्ये झाली सुरु
‘बागी’ फ्रँचायझी २०१६ मध्ये सुरू झाली आणि त्यानंतर २०१८ मध्ये ‘बागी २’ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ‘बागी ३’ २०२० मध्ये प्रदर्शित झाला आणि आता ‘बागी ४’ या मालिकेतील सर्वात धक्कादायक चित्रीकरण पाहायला मिळणार असल्याचे समजले आहे. चाहते या अॅक्शन-पॅक्ड चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.