'बालवीर' या टीव्ही मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याने २५ फेब्रुवारी रोजी नेपाळमध्ये त्याच्या दीर्घकाळच्या प्रेयसीसोबत लग्न केले आहे. हा अभिनेता आता नेपाळचा जावई झाला आहे. अभिनेत्याने त्याच्या लग्नाचे फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. तसेच या बातमीने सगळेच चकित झाले आहेत. तसेच अभिनेत्याने नुकताच साखरपुढा केल्यानंतर आता लग्न बंधनात अडकला आहे. अभिनेत्याच्या फोटोवर चाहत्यांच्या कंमेंटचा वर्षाव होत आहेत. लोक त्याला शुभेच्छा येत आहेत.
या टीव्ही अभिनेत्याने केले लग्न; नेपाळमध्ये दीर्घकालीन प्रेयसीसोबत बांधली रेशीम गाठ, पहा Photo (फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
देव जोशीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चर्चेत आहेत. फोटोंमध्ये हे जोडपे खूप खुश दिसत आहेत. या दोघांनी त्यांच्या आनंदाचे क्षण त्याच्या चाहत्यांसोबतही शेअर केले आहेत.
या छायाचित्रांमध्ये देव जोशी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केलेला दिसत आहे, ज्यामध्ये तो खूप देखणा दिसत आहे. तर त्याची प्रेयसी आरती लाल रंगाच्या वधूच्या लेहेंग्यात दिसत आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
देव जोशीची पत्नी आरतीने लाल लेहेंगा आणि अप्रतिम मेकअप करून स्वतःचा परिपूर्ण लूक पूर्ण केला आहे. तिच्या सौंदर्याने आणि चेहऱ्यावरील हास्य यामुळे तिचा लूक आणखी मोहक वाटत आहे.
लग्नाचे फोटो शेअर करताना अभिनेता देवने लिहिले की, 'ही तारीख कायम लक्षात ठेवली जाईल. मी तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही माझ्यासाठी आहात.' असे लिहून त्याने चाहत्यांना आनंदी करून टाकले आहे.
देव जोशीच्या लग्नाच्या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे आणि चाहते त्यांना खूप शुभेच्छा आणि अभिनंदन देत आहेत. लग्नाच्या फोटोंपूर्वी देवने त्याचे हळदी आणि मेहंदीचे फोटोही शेअर केले होते. जे चाहत्यांना खूप आवडले.