फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 : अलीकडेच, बिग बॉस 18 मध्ये फॅमिली वीक झाला. यामध्ये स्पर्धकांचे कुटुंबीय घरामध्ये गेले होते. या आठवड्यामध्ये फॅमिली ड्रामा पाहायला मिळाला आणि भावना पाहायला मिळाल्या. यावेळी अनेक स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबीयांकडून खेळाबाबत सल्ले देण्यात आले, त्यानंतर स्पर्धकांचा खेळ पूर्वीपेक्षा खराब होताना दिसत आहे. फॅमिली वीकमध्ये सर्वात मोठे वाद हे विवियन डिसेना आणि चाहत पांडेच्या कुटूंबियांनी केला आहे. चाहत पांडेच्या आईचे म्हणणे होते की तिच्या मुलीवर झालेले अत्याचार अविनाश मिश्राने केले होते यावरून तिने अविनाश मिश्राला खडसावले होते तर विवियन डिसेना खेळ खराब करण्याच्या यादीत अविनाश मिश्राचा हात आहे असा तिने आरोप केला होता. त्याचबरोबर आणखी कोणत्या स्पर्धकांच्या कुटूंबीयाने सदस्याचा खेळ खराब केला आहे यावर एकदा नजर टाका.
आगामी विकेंडच्या वॉरच्या भागामध्ये विवियन डिसेनाची सलमान खान आणि बिग बॉसची माजी स्पर्धक कामिया पंजाबी शाळा घेताना दिसणार आहे. विवियन डिसेनाच्या खेळात आता मोठा बदल दिसून येत आहे. विवियनची पत्नी नूरन अलीने त्याला अविनाश आणि ईशाबद्दल सावध केले. तिने सांगितले की, असे मित्र असण्यापेक्षा चांगले शत्रू असलेले बरे. यानंतर विवियनचा खेळ खराब होताना दिसत आहे. विवियनबाबत सलमान खानने असेही सांगितले की, त्याचा खेळ आता संपला आहे. विवियनबाबत सलमान म्हणाला की, तो त्याच्या घरच्या मैदानावर नीट खेळू शकत नाही.
चाहत पांडेच्या आईने ज्याप्रकारे येऊन काही स्पर्धकांवर हल्ला केला, त्याचे परिणाम तिची मुलगी चाहतला भोगावे लागले आहेत. चाहत पांडेच्या आईने अविनाश मिश्रावर घरामध्ये फॅमिली वीकमध्ये आल्यानंतर अनेक आरोप केले होते. यावरून वीकेंडच्य वारमध्येही सलमानने चाहतला याबद्दल तिला खडसावले आहे. चाहतचा खेळ पूर्णपणे गडबडलेला दिसतो. याशिवाय चाहतच्या बॉयफ्रेंडबाबतही सध्या बराच गदारोळ सुरू आहे. तिचे टेलिव्हिजनवर बॉयफ्रेंडसोबत काही फोटो आणि ऑडिओ दाखवण्यात आले.
Bigg Boss 18 : टॉप 5 मध्ये मोठी उलथापालथ, विजेता बनण्याचा क्रमवारीतून हा स्पर्धक बाहेर!
फॅमिली वीकमध्ये अविनाश मिश्रा पूर्णपणे उघड केले होते. अनेक स्पर्धकांच्या कुटुंबीयांनी अविनाशला टार्गेट केले होते. विवियनच्या पत्नीने त्याचा खेळ उघड केला. साहजिकच अविनाशचा खेळही सध्या पूर्णपणे डळमळीत झाला आहे. त्यामुळे आता आगामी भागामध्ये त्याचा खेळ कसा असेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
ईशा सिंगचा खेळही आता पूर्णपणे बिघडला आहे. अविनाशच्या जोरावर ती इथपर्यंत पोहोचली असल्याचंही ईशाबद्दल बोललं जात आहे. तिची आईही आली आणि ईशाच्या खेळातील काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. एवढेच नव्हे तर तिच्या आईने अनेक स्पर्धकांच्या खेळावर देखील टिपणी केल्या होत्या त्या प्रेक्षकांना अजिबात आवडल्या नाहीत.
रजत दलालचा खेळही सध्या फारसा जोरात दिसत नाही. रजतची आई आल्यापासून तो खेळात खूपच मवाळ झाला आहे. मात्र, रजतला बाहेरून मोठा पाठिंबा आहे. त्याचबरोबर रजत दलालच्या समर्थनात त्याच्या आईने करणवीर मेहरा आणि चुम दारंग या दोघांना बरेच काही बोलली होती हे प्रेक्षकांना आवडले नाही त्यामुळे यावर प्रेक्षकांनी बरेच टीका देखील केली होती.