फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 : आज आगामी भागामध्ये बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी शनिवारचा वॉर पाहायला मिळणार आहे. यासाठी बिग बॉसचे प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. सोशल मीडियावर सध्या प्रचंड बिग बॉस १८ ची चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस 18’च्या ‘वीकेंड का वार’चे शूटिंग झाले आहे. या आठवड्यामध्ये शनिवारचा वॉरमध्ये सलमान खान नसणार आहे, यावेळी सलमान खानच्या जागी फराह खान ‘वीकेंड का वार’ होस्ट करत आहे. कालच्या भागानंतर आता एक प्रोमो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे यामध्ये आता फराह खान बिग बॉसच्या घरामधील सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे.
फराहने ‘वीकेंड का वार’मध्ये करण वीर मेहराचं कौतुक केलं आहे. त्याने करणची तुलना ‘बिग बॉस 13’ विजेता आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत केली आहे. या प्रोमोमध्ये फराह खान फुल ऑन ॲक्शन मूडमध्ये दिसत आहे. फराह शोचा स्पर्धक तेजिंदर पाल सिंग बग्गा यांना अनेक प्रश्न विचारताना आणि करण वीर मेहरासोबत केलेल्या गैरवर्तनाबद्दल त्याला फटकारताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये फराह खान राजकारणी व्यक्तिमत्व तिजेंदर बग्गाला प्रश्न करते की त्याचा मामा हा पंतप्रधानांच्या इथे बाथरूम साफ करतात ना? हे वाक्य कितपत खार आहे ते सांगा. यावर तिजेंदर बग्गा म्हणतो की, चुकीचं आहे. जर हे वाक्य इशा करणने केलं असत तर सगळ्यांनी त्याला घेरलं असतं.
Bigg Boss 18 : फराह खानने रजत दलालला दिली वॉर्निंग! म्हणाली आणखी एक चूक केली तर…
पुढे ती म्हणाली की, शोमध्ये फक्त करणबद्दल बोलणं, करणबद्दलचे विचार तुम्हाला सगळ्यांना वेड लागले आहे. हा करणवीर मेहरा शो झाला आहे. याआधी मी पाहिलं आहे मागील सीझनमध्ये एक स्पर्धक ज्याला संपूर्ण घराणे टार्गेट केलं होत तो म्हणजेच सिद्धार्थ शुक्ला आणि तो शो जिंकला होता.
Finally, the promo we’ve all been waiting for is here! 🔥🔥🔥
KV finally getting the recognition and praise he’s been long overdue. 🔥🔥🔥#KaranveerMehra #BB18 #BiggBoss18 pic.twitter.com/ckunQI0Vst
— • (@wildxcreations) December 6, 2024
फराहनेही करणच्या गेमप्लेचे कौतुक केले. तो म्हणाला की करणचा खेळ इतरांपेक्षा वेगळा आहे आणि हा सीझन त्याच्या नावाने ओळखला जाईल. एवढेच नाही तर फराहने करणसाठी खास गिफ्टही आणले आहे. त्याने करणला स्टोअर रूममधून गिफ्ट आणायला सांगितले. जेव्हा करणने स्टोअर रूममधून पदक आणले तेव्हा फराहने सांगितले की, तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी हे पदक पाठवले आहे. फराहने ‘वीकेंड का वीर’मध्ये रजत दलाल, विवियन डिसेना, ईशा सिंग, अविनाश मिश्रा आणि सारा अरफीन खानची वर्गवारी केली आहे. ते काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा .