फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारतामध्ये चर्चेत असलेल्या टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस १८ सध्या चर्चेचा विषय आहे. या घरामध्ये असलेल्या सदस्यांच्या मनोरंजनामुळे त्याच्या पॉप्युलॅरीटीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल मीडियावर अनेक सदस्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. या आठवड्यामध्ये मोठे वाद आणि मारहाणी पर्यत भांडण पाहायला मिळाली. प्रेक्षकांचे घरामधील सदस्यांनी भरपूर मनोरंजन केले आहे. या आठवड्यामध्ये कोणत्या सदस्यांची क्लास घेतली जाईल यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
Bigg Boss 18 : करणवीर मेहराने उघड केलं सुशांत सिंह राजपूतसोबत नातं!
या आठवड्यामध्ये विकेंडच्या वॉरला सलमान खान नसणार आहे. त्यामुळे सलमानच्या जागेवर प्रसिद्ध महिला दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान सदस्यांची शाळा घेणार आहे. सोशल मीडियावर आता एक प्रोमो प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये आता फराह खान सदस्यांची शाळा घेताना दिसणार आहे.
फराह खानने ‘बिग बॉस 18’ च्या वीकेंडच्या वारमध्ये घरातील सदस्यांना आगामी भागामध्ये खूप क्लास देताना दिसणार आहे. समोर आलेल्या अपडेट्सनुसार, फराहने करण वीर मेहराचं कौतुक करताना दिसणार आहे. ईशा सिंगला स्वार्थी म्हटले आहे. विवियन डिसेना आणि अविनाश मिश्रा यांना ईशाचे असिस्टंट म्हटले आहे इतकेच नाही तर त्यांनी रजत दलालला बिग बॉसचा निर्णय जाहीर केला आहे.
#WeekendKaVaar Promo: KV’s fan Farah Khan called Bigg Boss 18 “The Karan Veer Mehra Show”, and compared him with Sidharth Shuklapic.twitter.com/bvb2CcU71u
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 6, 2024
बिग बॉसची बातमी देणाऱ्या ‘बिग बॉस तक’ या पेजनुसार घरातील भांडणानंतर फराहने रजतला इशारा दिला आहे. फराह म्हणाली की, जर त्याने पुन्हा एकदा कोणाला शिवीगाळ केली किंवा कोणाला मारहाण केली किंवा कोणाची कॉलर पकडली तर तिला ‘बिग बॉस’च्या घरातून तत्काळ हाकलून दिले जाणार आहे. फराहने सारा अरफीन खानचा क्लासही घेतला. फराहने व्हिडिओ प्ले केला ज्यामध्ये सारा करणवीरवर पाणी फेकत आहे आणि घाणेरड्या भाषेत बोलत आहे. व्हिडिओ संपल्यानंतर फराहने साराला विचारले, “आता जेव्हा तू टीव्हीवर पाहिलास तेव्हा तुला कसा वाटला?”
Bigg Boss 18 : रजत दलालने केलेल्या किडनॅपिंगवर प्रश्न, म्हणाला- मी बांगड्या घातल्या नाहीत…
आता फराह खान कशाप्रकारे घरामधील सदस्यांची शाळा घेणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आगामी भागामध्ये काय होणार याचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.
खरे तर सलमान खान सध्या भारतात नाही. 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘दबंग रिलोडेड’ या आंतरराष्ट्रीय शोसाठी तो दुबईला गेला आहे. अशा परिस्थितीत या आठवड्यात ‘बिग बॉस 18’ च्या वीकेंड वॉर होस्ट करण्याची जबाबदारी फराह खानवर देण्यात आली आहे.