फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
बिग बॉस 18 ची अदालत : बिग बॉस 18 चा बारावा आठवडा सुरू झाला आहे. आता या सिझनच्या फिनालेला फक्त 3 आठवडे शिल्लक राहिले आहेत. या आठवड्यामध्ये आठ सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार ते पाहणं मनोरंजक ठरेल. कालचा भाग झाला यामध्ये बिग बॉसने घरातल्या सदस्यांना एक टास्क दिला होता. यामध्ये मागील काही दिवसांपासून घरामध्ये एक मुद्दा होता तो म्हणजेच कशिश कपूरने अविनाश मिश्रावर काही गंभीर आरोप लावले होते. यामध्ये तिने अविनाशला तो ‘वुमनलायझर’ असे म्हंटले होते.
आता बिग बॉसने घरातल्या सदस्यांची अदालत ठेवली आणि यामध्ये अविनाश मिश्रा दोषी तर कशिश या घटनेचा बळी असे सांगण्यात आले होते. त्यानंतर अविनाश मिश्राचा वकील करणवीर मेहराला ठेवण्यात आले होते आणि काशिश कपूरने रजत दलालला तिचा वकील निवडले होते. यानंतर करण म्हणतो की, कशिशने अविनाशवर जे काही आरोप केले आहेत ते चुकीचे आहेत. ही क्लिप पाहून कशिशची चूक असल्याचे स्पष्ट होते. विवियनही अविनाशला सपोर्ट करतो आणि इशा सिंगनेही अविनाशची सर्वांसमोर माफी मागितली की तिला त्याच्यावर शंका आली.
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा रजत दलालमध्ये धक्काबुक्की! राशनच्या टास्कवरून भिडले एकमेकांशी
सारा मग कशिशचा बचाव करण्यासाठी साक्षीदार म्हणून येते आणि मग कशिशने तिला या प्रकरणावर काय बोलले याबद्दल करण साराचा सामना करतो. करण बोलत असताना त्याचा हात कशिशला लागतो आणि तिने करणला दूर राहण्यास सांगितले. करण नंतर साराच्या खेळाचा पर्दाफाश करतो की त्यानेच हे प्रकरण 10 दिवसानंतर उचलले तर कशिश आणि अविनाश त्या चर्चेनंतर पुढे गेले. त्यानंतर करणवीर मेहरा म्हणतो की, माझा आताच तिला चुकून हात लागला आणि तिची प्रतिक्रिया काय होती की मला हात लावू नकोस. म्हणेजच तू तुमच्या मर्जीनुसार तुम्ही एखाद्या व्यक्तीला दोषी ठरवू शकता.
The best of Karan Veer Mehra >>>
Loved how he destroyed the fake touch card & woman card we boys face usually in our daily lives 🔥
Feeling proud to be a KVM fan 🩷👏🏻pic.twitter.com/ag6A7J08GE
[ #KaranIsTheBoss • @JioCinema ]
[ #KaranVeerMehra • #BiggBoss18 ]— 𝐏𝐚𝐫𝐚 (@The_Peace_Point) December 25, 2024
सारा पुन्हा म्हणाली, विचार करा, जर ती तुझी बहीण आहे. करण म्हणाला की, तिने असे काही केलेच नसते पण जर माझ्या बहिणीने फ्लर्टींग केले असते तर मला काही प्रॉब्लेम झाला नसता पण तर तिने एखाद्या व्यक्तीला खाली खेचण्याचा प्रयत्न केला असता तर मी तिच्या कानशिलात मारली असती. तू शांतच बस सारा तू मुर्खासारखी दिसत आहेस.