फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 – करणवीर मेहरा विरुद्ध रजत दलाल : बिग बॉस 18 च्या संदर्भात सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. या शोबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता झपाट्याने वाढत आहे. शो आता वेगाने फिनालेकडे वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत स्पर्धकांमधील स्पर्धा खूपच तीव्र झाली आहे. विजय मिळवण्यासाठी तो नातेसंबंधांचाही विचार करत नाही. अशा परिस्थितीत दिग्विजय सिंह यांना नुकतेच त्यांच्याच मित्रांनी दगा दिल्याने त्यांना घरातून बाहेर काढण्यात आले आहे. कालच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशनची प्रक्रिया झाली. यामध्ये या आठवड्यात सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. यामध्ये विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, इशा सिंग, कशिश कपूर, सारा खान, रजत दलाल आणि चाहत पांडे हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत.
Bigg Boss 18 : नॉमिनेशनमध्ये विवियन डिसेना घरातल्या सदस्यांच्या निशाण्यावर! म्हणाले – तुझं अस्तित्व…
आता आगामी भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यामध्ये आता करणवीर मेहरा आणि रजत दलाल यांच्यामध्ये कडाक्याचा वाद पाहायला मिळणार आहे. हा वाद धक्काबुक्कीपर्यत पोहोचला आहे. प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरातले राशन न घेता टाइम गॉडचे पद चुम दारंगने निवडले आहे. त्यानंतर आता सगळेच घरातले सदस्य तिच्यावर ओरडताना आणि भांडताना दिसत आहेत. यावर रजत दलाल चुमला म्हणतो की, एक आठवडा आपल्याकडे जेवण नसणार आहे. तर दुसरीकडे इशा म्हणते की, अविनाशने केलं तर चुकीचं आहे इशाने केलं तर अजून चुकीचं आहे. यावर चुम म्हणते की, मी स्वीकारली आहे माझी चूक.
त्यानंतरही सगळेजण चुमशी भांडताना आणि ओरडताना दिसत आहेत. यावर करणवीर मेहरा म्हणतो की, मारायचं आहे की, भांडायचं आहे? नाही ना मग कशाला तिच्या मागे लागले आहेत. यावर नंतर रजत दलाल करणवीर मेहराला म्हणतो की, हे नाटक नंतर दुसऱ्यांसमोर कर. त्यावेळी रजत दलाल करणच्या जवळ येतो तेव्हा करण त्याला म्हणतो की, लांब राहून बोल. तुझ्यासारखे खूप पहिले आहेत मी, लांब राहून बोल माझ्याशी इथेच आहे मी जे करायच आहे ते कर.
Tomorrow’s Promo: Rajat Dalal vs Karanveer 🔥 Chum Darang becomes the next time god and gets fired as well. Avinash aggression.https://t.co/FNqHjW39qD
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) December 23, 2024
प्रदर्शित झालेल्या प्रोमोनंतर पुढील एपिसोड फारच मनोरंजक होणार आहे. त्यामुळे चाहते सोशल मीडियावर करणवीर मेहरा आणि रजत दलालचे भांडण पाहण्यासाठी उत्सुक आहेत. राशन पणाला लावल्यानंतर आता चुम टाइम गॉड होते आणि त्यानंतर आता घरामध्ये मोठे वाद पाहायला मिळणार आहेत. पण नांतर काही खबरी अकाउंटने शेअर केले आहे की, टाइम गॉडच्या पदावरून चुमला हटवण्यात आले आहे.